शरदरावांकडून तरी शिका! पंतप्रधान मोदींकडून पवारांचं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यसभेतही काँग्रेसवर हल्लाबोल केला.
Sharad Pawar, PM Narendra Modi
Sharad Pawar, PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी राज्यसभेतही काँग्रेसवर हल्लाबोल केला. कोरोना काळात काँग्रेसनं राजकारण केल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केले आहे. कोरोनाचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला काँग्रेसनं दांडी मारली होती. त्याचाच संदर्भ देत पंतप्रधानांनी शरद पवारांचे आभारही मानले. (Narendra Modi Praised Sharad Pawar)

पंतप्रधान मोदींनी सोमवारी लोकसभेत केलेल्या भाषणावरून महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत. काँग्रेस तिकीटे वाटून बिहार, उत्तर प्रदेशातील लोकांना राज्याबाहेर पाठवले, अशी टीका मोदींनी केली होती. त्यावर राष्ट्रवादीसह काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. मंगळवारी राज्यसभेतही पंतप्रधानांनी काँग्रेसला जोरदार टोले लगावले. पण यावेळी त्यांनी शरद पवार यांचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Sharad Pawar, PM Narendra Modi
पंतप्रधान मोदीजी, मी तुमच्यावर नाराज नाही पण हैराण झाले! सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र

कोरोना काळात बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, कोरोना काळात देशातील मुख्यमंत्र्यांसोबत 23 बैठका घेतल्या. केंद्राने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर काही जणांकडून बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न होता. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बैठकीला हजर राहू नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले. तेही उपस्थित राहिले नाही. पण शरदरावांचे (शरद पवार) आभार मानतो. शरद पवार, तृणमूल काँग्रेस व इतर पक्षाच्या नेत्यांनी बैठकीला हजेरी लावली.

बैठकीला हजर न राहण्याचा निर्णय यूपीएचा नाही, असं म्हणत पवारांनी जास्तीत जास्त लोकांशी मी बोलेन, असं सांगितलं होतं. त्यामुळे त्यांचे आभार मानतो. मानव जातीवर कोरोनाचे संकट असताना काँग्रेसनं बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे शरद पवार यांच्याकडून काहीतरी शिकायला हवे. त्यांनी बैठकीत अनेक सुचनाही केल्या, असे मोदींनी सांगितले.

दरम्यान, कोरोना काळानंतर रोजगार वाढल्याचे सांगत मोदी म्हणाले, कोरोना लॉकडाऊन उठल्यानंतर देशातील नोकर भरतीत दोन पटीने वाढ झाली आहे. नॅसकॉमच्या अहवालतही हेच दिसते. अलीकडे आयटी क्षेत्रातही 27 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. कोरोना काळात गरिबांच्या सशक्तीकरणासाठी सरकारने खूप प्रयत्न केले. शंभर टक्के लसीकरणाकडे आपली वाटचाल सुरू आहे. या काळात देशातील 80 कोटींहून अधिक नागरिकांना मोफत रेशनचे वाटप करण्यात आल्याचेही मोदींनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com