मी पंतप्रधान नाहीच, केवळ १३० कोटी जनतेचा प्रधानसेवक : नरेंद्र मोदी

Narendra Modi | पंतप्रधान मोदींच्या सरकारची ८ वर्ष
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

(8 years of modi government)

सिमला : २०१४ पासून केंद्रात भाजपचे (BJP) सरकार आल्यानंतर कोणत्याही स्थितीत भ्रष्टाचार खपवून न घेण्याचे धोरण अंगिकारले असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केला. ते सरकारच्या आठव्या वर्षपूर्तीनिमित्त सिमल्यातील रिज मैदानात आयोजित सभेत बोलत होते. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी शेतकरी सन्मान निधीचा ११ वा हप्ता म्हणून ८० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांत २१ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले असल्याचेही आज जाहीर केले. तसेच आपण पंतप्रधान नसून देशातील १३० कोटी जनतेचा प्रधान सेवक आहे, असेही म्हणाले. (Narendra Modi Latets News)

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले, विविध योजनांतील लाभार्थ्यांच्या यादीत असलेले नऊ कोटीपेक्षा बनावट नावे केंद्रातील सरकारने हटविली. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळाला आहे. पंतप्रधान घरकुल योजना असो, शिष्यवृत्ती असो किंवा अन्य कोणतीही योजना असो, त्याचा थेट लाभ लोकांना मिळवून दिला आणि भ्रष्टाचार संपवला आहे. थेट निधी हस्तांतराच्या माध्यमातून विविध योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात २२ लाख कोटीहून अधिक रक्कम हस्तांतरित केली आहे. २०१४ च्या सरकारने भ्रष्टाचाराला प्रशासनाचा एक अविभाज्य घटक म्हणून गृहित धरले होते. भ्रष्टाचाराला संपविण्याऐवजी त्याच्यासमोर मान टाकली होती. तत्कालीन काळात विविध योजनांचा पैसा हा गरजूंपर्यंत पोचत नव्हता आणि लाभार्थी वंचित राहत होते. पण आता लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होत असल्याने भ्रष्टाचाराला आळा बसला आहे.

Narendra Modi
पिंपरी-चिंचवडमध्ये आरक्षण सोडतीने विद्यमान २५ नगरसेवकांचा पत्ता कट; गाववाल्यांची कोंडी

भारताची जागतिक पातळीवर आता प्रतिमा बदलली आहे. भारत गरज म्हणून नाही तर दुसऱ्याच्या मदतीसाठी मित्रत्वाचा हात पुढे करत आहे. अनेक देशांना भारताकडून लसची निर्यात करण्यात आली. भारतात ड्रोनचा वापर वाढला आहे. यामुळे दुर्गम भागातील लोकांना ड्रोनच्या माध्यमातून मोठा फायदा मिळणार आहे. यानुसार गेल्या आठ वर्षांत स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवासाठी भारताचा सक्षम आधार तयार झाला आहे. चालू अर्थसंकल्पात केंद्राने पर्वतमाला योजनेची घोषणा केली. याचा हिमाचल प्रदेशला देखील लाभ मिळणार आहे. आयुष्यमान भारत योजनेतंर्गत जिल्हा आणि ब्लॉक येथे गंभीर आजारावर उपचाराच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज स्थापन करण्याच्या दृष्टीने काम केले जात आहे. त्यामुळे गरीब कुटुंबातील मुलगा डॉक्टर होऊ शकेल. मेडिकल आणि तांत्रिक शिक्षण मातृभाषेत देण्याबाबत प्रस्ताव मांडल्याचेही मोदी म्हणाले.

Narendra Modi
नक्क्वींना लोकसभा की उपराष्ट्रपतीपद? भाजपच्या मुस्लिम चेहऱ्यासाठी चाणाक्यांच्या मनात काय?

हिमाचल प्रदेशचे कौतुक

मुद्रा योजनेत ७० टक्के महिला असून त्या उद्योजक होऊन रोजगार देत आहेत. हिमाचल प्रदेशातील प्रत्येक घरात जवान आहे. हिमाचल वीरांची भूमी आहे. यापूर्वीच्या सरकारांनी दिलेली वागणूक हिमाचलचे नागरिक कधीही विसरू शकत नाही, असे मोदी म्हणाले. अगोदरच्या सरकारांनी वन रँक वन पेन्शनच्या नावावर फसवणूक केल्याचाही आरोप मोदी यांनी केला. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचे अभिनंदन करताना म्हणाले, की भारतात जयराम यांच्या सरकारने लसीकरणाचे लक्ष्य सर्वात अगोदर गाठले आहे. ३५ कोटी मुद्रा कर्ज देऊन कोट्यवधी युवकांना स्वयंरोजगार दिल्याचेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com