हिमाचल जिंकणाऱ्या काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदासाठी ‘या’ मायलेकासह पाच नावे आघाडीवर!

सर्वाधिक ४० जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचे हिमाचल प्रदेशमध्ये सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे.
Himachal Pradesh Congress Leader
Himachal Pradesh Congress LeaderSarkarnama

चंदीगड : सर्वाधिक ४० जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचे (Congress) हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे. या निवडणुकीत काँग्रेसने ४० जागा जिंकत भाजपचा (BJP) पराभव केला आहे. सरकार स्थापन करणाऱ्या काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे असणार याची चर्चा सुरू आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह, विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्री, विक्रमादित्य सिंह, माजी प्रदेशाध्यक्ष सुखविंदर सिंग, धनिराम संदील यांची नावे आघाडीवर आता काँग्रेस श्रेष्ठी कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालणार हे पाहावे लागणार आहे. (These five names are in forefront from Congress for the post of Himachal Pradesh Chief Minister)

हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत ६८ जागांपैकी काँग्रेसने ४० जागा जिंकल्या आहेत. सत्ताधारी भाजपला मात्र २५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. अपक्ष उमेदवार तीन जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे हिमाचलमध्ये काँग्रेसचे सरकार येणार हे आता निश्चित आहे. मात्र, काँग्रेस मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचे नाव निश्चित करते, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Himachal Pradesh Congress Leader
भाजप मुख्यमंत्र्यांचा राजीनामा : राजीनाम्यानंतर म्हणाले, ‘बोलावणे आले तर दिल्लीला....’

काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांचे नाव आघाडीवर आहे. काँग्रेसनेही प्रतिभा सिंह यांचे नाव पुढे करून ही निवडणूक लढवली आहे. प्रतिभा या माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांच्या पत्नी आहेत. काँग्रेसही वीरभद्र यांच्या विकासाचे मॉडेल पुढे नेण्याची चर्चा करत आहे, अशा परिस्थितीत वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर मानल्या जात आहेत. सध्या प्रतिभा मंडी लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. त्या मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना सहा महिन्यांत कोणत्याही जागेवरून विधानसभा निवडणूक जिंकावी लागेल.

Himachal Pradesh Congress Leader
शिक्षिकेची नोकरी सोडून निवडणूक लढवली अन्‌ भाजपच्या बड्या नेत्याचा पराभव केला!

हरोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले मुकेश अग्निहोत्री हे देखील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून मुकेश यांनी हिमाचल प्रदेश विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावली आहे. मुकेश हे सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Himachal Pradesh Congress Leader
शिवरायांच्या अवमानावर बोलणारे अमोल कोल्हेंचा माईक बंद केला : महाराष्ट्रात संतापाची भावना

प्रतिभा सिंह मुख्यमंत्री झाल्या नाहीत, तर त्यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह मुख्यमंत्री होऊ शकतो. विक्रमादित्य तरुण असून त्यांना संधी दिल्यास काँग्रेस तरुणांना नवा संदेश देऊ शकतो. यासोबतच हिमाचलची सत्ताही वीरभद्र कुटुंबाच्या हातात अबाधित राहील. युवकांना जोडण्यासाठी विक्रमादित्य यांनी निवडणुकीपूर्वी राज्यभर रोजगार संघर्ष दौरा काढला होता.

Himachal Pradesh Congress Leader
Himachal Pradesh Election: भाजपचे पाच बडे मंत्री हिमाचलमध्ये पराभवाच्या छायेत!

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुखविंदर सिंग यांचेही नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे आहे. सुखविंदर पक्षाच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष आहेत. राज्यात पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी सुखविंदर यांच्यावर होती. सुखविंदर यांना मुख्यमंत्री करून काँग्रेस पंजाबलाही लक्ष्य करू शकते. यावेळी पंजाबमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. सुखविंदर सिंग यांचे कनेक्शन पंजाबचे आहे.त्यांना हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनवून काँग्रेस शिखांमध्ये नवीन प्रवेश करण्याचा प्रयत्न करू शकते.

Himachal Pradesh Congress Leader
भाजपला मोठा धक्का : या राज्यांतील सर्व उमेदवार पिछाडीवर!

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनीराम नरेनूराम संदिल यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. कोळी समाजात धनीराम यांचे चांगले प्राबल्य आहे. ते दोन वेळा लोकसभेवर निवडूनही गेले आहेत. यावेळी धनीराम सोलनमधून निवडणूक लढवत आहेत.

आठवेळा निवडणूक जिंकणारे कौल सिंह मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतून बाद

दरांग मतदारसंघातून आठ वेळा आमदार राहिलेले कौल सिंह हेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र, त्यांचा भाजपच्या पूरन चंद यांनी केवळ १०३३ मतांनी पराभव केला. या पराभवामुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दाव्याला खो बसला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com