India Vs Pakistan : पाकाड्यांची पुरती जिरली तरीही पंतप्रधान शाहबाज म्हणतो, 'हा आमचा विजय...'

Shehbaz Sharif On Ceasefire : शस्त्रसंधी झाली असली तरी पाकिस्तान काही सुधारण्याचे नाव घेत नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी शस्त्रसंधीवरून भलताच दावा केला आहे.
Prime Minister Shehbaz Sharif addressing the media on the India-Pakistan ceasefire, calling it a diplomatic victory for Pakistan.
Prime Minister Shehbaz Sharif addressing the media on the India-Pakistan ceasefire, calling it a diplomatic victory for Pakistan.Sarkarnama
Published on
Updated on

Ceasefire Update : भारताच्या हल्ल्यानंतर चरपड झालेल्या पाकिस्तानने अमेरिकेसह इतर देशांकडे मदतीची याचना करत युद्ध थांबण्याची विनंती केली होती. अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. या शस्त्रसंधीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानी जनतेला उद्देशून भाषण केले.

भारताच्या हल्लामुळे पुरती नाचक्की झालेल्या पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आपल्या भाषणात मात्र भारतावर युद्धाचा आरोप करत युद्धबंदी म्हणजे पाकिस्तानचा विजय असल्याचे म्हटले आहे. हा आमच्या तत्त्वांचा आणि सन्मानाचा विजय आहे. हा विजय केवळ शस्त्रदलाचा नाही तर संपूर्ण देशाचा विजय असल्याचे शरीफ यांनी सांगितले.

Prime Minister Shehbaz Sharif addressing the media on the India-Pakistan ceasefire, calling it a diplomatic victory for Pakistan.
Cyber attacks on India : सीमेपलीकडून भारतावरील सायबर हल्ले तीव्र; उल्हासनगर महापालिकेच्या संकेतस्थळावर आक्षेपार्ह मजकूर झळकला

डोनाल्ड ट्रम्प यांचे मानले आभार

शाहबाज शरीफ यांनी ट्विट करत शस्त्रसंधीसाठी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. तसेच ते म्हणाले, आम्ही अध्यक्ष ट्रम्प यांचे त्यांच्या नेतृत्वासाठी आणि या भागातील शांततेसाठी घेतलेल्या सक्रिय भूमिकेसाठी आभार मानतो तसेच उपराष्ट्रपती जे.डी. वॅन्स आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचेही दक्षिण आशियातील शांततेसाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल आभार मानतो.

चीनलाही दिले श्रेय

शाहबाज शरीफ यांनी आपल्या भाषणात युद्धबंदीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्याोबत चीन, सौदी अरेबिया, ब्रिटन, तुर्की, संयुक्त राष्ट्राचे देखील आभार मानले. या देशांनी युद्धबंदीसाठी प्रयत्न केल्याचे देखील शरीफ यांनी म्हटले.

Prime Minister Shehbaz Sharif addressing the media on the India-Pakistan ceasefire, calling it a diplomatic victory for Pakistan.
India vs Pakistan : पाकिस्तानच्या गोळीबारात सुभेदार मेजर पवन कुमार जरीयाल शहीद; ऑगस्ट महिन्यात होणार होते निवृत्त

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com