Election Commission : देशातील तब्बल 345 राजकीय पक्षांची नोंदणी होणार रद्द; आयोगानं उचललं मोठं पाऊल...

Why the Election Commission Is Targeting 345 Parties : निवडणूक आयोगाने याबाबत माहिती दिली आहे. आयोगाने 345 नोंदणीकृत बिगर - मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना (RUPP) यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
Election Commission
Election Commission Sarkarnama
Published on
Updated on

Political Parties in India : मागील काही वर्षांमध्ये देशात राजकीय पक्षांची संख्या झपाट्याने वाढली आहे. सध्या 2800 हून अधिक नोंदणीकृत बिगर मान्यताप्राप्त पक्ष विविध राज्यांमध्ये आहेत. पण आपली नोंदणी टिकवून ठेवण्यासाठी अनेक पक्षांना अटी पूर्ण करता आलेल्या नाहीत. असे 345 पक्ष आढळून आले असून त्यांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.

निवडणूक आयोगाने याबाबत माहिती दिली आहे. आयोगाने 345 नोंदणीकृत बिगर - मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना (RUPP) यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या पक्षांनी 2019 पासून गेल्या सहा वर्षांमध्ये किमान एक निवडणूक लढवण्याची अटही पूर्ण केलेली नाही. तसेच पक्षांची कार्यालये प्रत्यक्षरित्या कुठेही अस्तित्वात नाहीत, असे हे 345 पक्ष आहेत.

निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या 2,800 हून अधिक RUPP पैकी अनेक पक्षांनी नोंदणीकृत पक्ष म्हणून आपली मान्यता सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या अटी पूर्ण केल्या नसल्याचे निवडणूक आयोगाला आढळून आले होते. अशा पक्षांचा शोध घेण्यासाठी आयोगाने देशव्यापी मोहीम राबवली.

Election Commission
CM Convoy : धक्कादायक : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील 19 गाड्यांमध्ये डिझेल ऐवजी भरले पाणी

मोहिमेअंतर्गत आतापर्यंत अशा 345 पक्षांची यादी तयार करण्यात आली. कोणताही पक्ष अनावश्यकपणे यादीतून वगळला जाऊ नये, यासाठी संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना (सीईओ) पक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून उत्तर आल्यानंतर सुनावणीद्वारे या पक्षांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल. कोणत्याही पक्षाला यादीतून वगळण्याबाबत अंतिम निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेईल. यामध्ये महाराष्ट्रातील किती पक्षांचा समावेश आहे, याची माहिती आयोगाकडून देण्यात आलेली नाही.

राजकीय व्यवस्था स्वच्छ करण्याच्या उद्देशाने ही मोहिम राबविण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात या 345 पक्ष आढळून आले आहेत. यापुढेही ही मोहीम सुरू ठेवली जाईल, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहेत.

Election Commission
Amit Shah : आक्रमक नेते अण्णामलाई यांना दिल्लीत मोठं पद; थेट अमित शहांनीच दिले संकेत...

पक्षांचे तीन प्रकार

देशातील राजकीय पक्षांची लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 29A  च्या तरतुदींअंतर्गत निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. राष्ट्रीय, प्रादेशिक आणि बिगर मान्यताप्राप्त हा दर्जा कायद्यातील तरतुदींप्रमाणे संबंधित पक्षांना दिला जातो. राजकीय पक्ष म्हणून नोंदणी झाल्यानंतर संबंधित पक्षाला कर सवलतीसारखे काही विशेषाधिकार मिळतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com