Video Pooja Khedkar : मोठी बातमी! पूजा खेडकरचे IAS पद रद्द, यूपीएससीचा निर्णय

UPSC Cancels Pooja Khedkar's Provisional Candidature : पूजा खेडकर यांचे IAS पद तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
IAS Pooja Khedkar
IAS Pooja KhedkarSarkarnama
Published on
Updated on

Pooja Khedkar News : अपंगत्वाच्या बनावट कागदपत्रांद्वारे IAS केडर मिळवणाऱ्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांचे IAS पद रद्द करण्यात आले आहे. यूपीएससीने हा निर्णय घेतला आहे. हे पद तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पूजा खेडकर या महाराष्ट्रात प्रशिक्षणार्थी IAS म्हणून कार्यरत होत्या. मात्र, आपल्या खासगी कारला अंबर दिवा लावल्याने तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत कार्यालयासाठी त्यांचा वाद झाला होता.

त्यामुळे खेडकर चर्चेत आल्या होत्या. पूजा खेडकर यांना अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर करत आयएसएस केडर मिळवल्याचे समोर आले होते. याची दखल यूपीएससीने घेत त्यांच्या विरोधात दिल्ली न्यायालयात गुन्हा दाखल केला होता.

IAS Pooja Khedkar
Uddhav Thackeray News : तुमच्या नाकावर टिच्चून सत्ता आणून दाखवतो; उद्धव ठाकरेंचे सत्ताधाऱ्यांना चॅलेंज

पूजा यांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आजच सुनावणी देखील होत आहे. मात्र, त्यापूर्वीच यूपीएससीने मोठा निर्णय घेत पूजा खेडकर यांचे IAS पद हे तात्पुरत्या स्वरुपात रद्द केले आहे.

पूजा हिला नोटीस बजावत तिची बाजू मांडण्यासाठी यूपीएससीने सांगितले होते. मात्र, या नोटीसला पूजाने उत्तर दिले नाही. त्यामुळे यूपीएससीने कारवाई करत तात्पुरत्या स्वरुपात पूजा यांचे आयएएस पद रद्द केले.

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कारनाम्यांची चर्चा महाराष्ट्रभर झाली. प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेल्या पूजा खेडकर यांचा शाहीथाट समोर आल्यानंतर त्यांच्याशी संबंधित वादग्रस्त प्रकरणे समोर आली. त्यांनी यूपीएससी परीक्षा देताना सादर केलेलं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तसेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे संशयाच्या भोवऱ्यात आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनवर असलेल्या पूजा यांनी नियम धाब्यावर बसवून आपल्या 'व्हीआयपी' नंबर असलेल्या खासगी ऑडी गाडीला त्यांनी लाल-निळा दिवा लावला. तसेच एका अधिकाऱ्याच्या अॅण्टी चेंबरमध्ये आपले आलिशान कार्यालय थाटले. तिथे आपल्या नावाची पाटीदेखील लावली.

त्यामुळे जिल्हाधिकारी इमारतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा त्यांचाच रुबाब भारी असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पुण्यातील रुबाबात चमकोगिरी करणाऱ्या अधिकारी पूजा खेडकरांची राज्य सरकारने थेट वाशिमला बदली केली होती.

(Edited By Roshan More)

IAS Pooja Khedkar
Devendra Fadnavis :'फडणवीसांना संपविण्यासाठी उद्धव ठाकरेंना शंभर जन्म घ्यावे लागतील', बावनकुळेंची टीका !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com