CM Pramod Sawant News : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना प्रमोशन? चर्चांना उधाण, पण...

Lok Sabha Election 2024 : भाजप नेते गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्लीसारख्या राज्यांमध्ये जबाबदारी संभाळली. स्टार प्रचारक म्हणून सावंत यांनी या चार राज्यांत मोठी जबाबदारी संभाळत कामाची छाप सोडली आहे.
CM Pramod Sawant
CM Pramod Sawantsarkarnama

Goa CM Pramod Sawant News : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बहुतांशी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कामाची छाप पक्षात सोडली. मात्र चर्चेत आलेत ते, भाजपचे स्टार प्रचारक गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant)! त्यांच्या कामाची छाप भाजप केंद्रीय नेत्यांच्या नजरेतू सुटली नसून त्यांना केंद्रीय पातळीवर बढती मिळणार, अशी चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) भाजप नेते गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्लीसारख्या राज्यांमध्ये जबाबदारी संभाळली. स्टार प्रचारक म्हणून त्यांनी या राज्यात काम पाहिले. मुख्यमंत्री सावंत यांनी या चार राज्यांत मोठी जबाबदारी संभाळत कामाची छाप सोडली. त्यामुळे त्यांना भाजपकडून (BJP) राष्ट्रीय पातळीवर राजकारणात मोठी संधी मिळणार, अशी चर्चा आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळत असल्याच्या चर्चांना जोर धरला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

CM Pramod Sawant
Mallikarjun Kharge : 'I.N.D.I.A'आघाडीचे पंतप्रधान कोण? - मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, 'हा प्रश्न..'

मुख्यमंत्री सावंत यांनी दिल्लीत प्रचाराची धुरा संभाळत तळ ठोकला होता. यावेळी त्यांनी भाजप संघटनेत पुढाकार घेत काम केले. दिल्लीच्या (Delhi) पाचही मतदारसंघात सभांचे नियोजन केले. रॅलींमध्ये सहभाग घेतला. गोव्याचा मुख्यमंत्री आणि दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन थेट आम आदमी पक्षाचे नेते मुख्यमंत्री अरविंद केरजीवाल यांच्यावर सावंत यांनी साधलेला निशाणा भाजप वरिष्ठ नेत्यांच्या नेजरतून सुटला नाही. याविषयी मुख्यमंत्री सावंत यांचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून कौतुक झाले. BJP will give Goa Chief Minister Pramod Sawant a big responsibility in Delhi

आपच्या (AAP) राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल प्रकरणात दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गप्प का?, असा सवाल मुख्यमंत्री सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. या प्रकरणाची संवेदनशीलता खूप असून, मुख्यमंत्री केजरीवाल आणि त्यांचे दिल्ली सरकार महिलाविरोधी असल्याचा, आरोप सावंत यांनी केला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या आरोपांची दखल दिल्लीसह गोव्यातील आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी घेतली. गोव्यातून आप नेत्यांनी केलेल्या टिकेला देखील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खुबीने उत्तर दिलं.

गोव्याची सेवा करायचीय : प्रमोद सावंत

भाजप नेते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या निवडणुकीत केलेल्या कामाची छाप केंद्रातील वरिष्ठ नेत्यांसमोर उमटली. त्यामुळे त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार, दिल्लीत जाणार, अशी चर्चा आहे. यावर प्रमोद सावंत यांनी एका शब्दात 'नाही', असे उत्तर दिले. ते म्हणाले, "पक्षाने प्रचाराची छोटी जबाबदारी दिली होती, ती पार पाडली. माध्यमातूनच, अशा चर्चा होत आहेत. मला आताच दिल्लीला जायचे नाही. काही वर्षे गोव्याची सेवा करायचीय. देवाने आणि लोकांनी गोव्याची सेवा करण्याची संधी दिली आहे. लोकांचा आशीर्वाद आहे हे, महत्वाचे".

CM Pramod Sawant
BJP Politics : पंतप्रधान पदासाठी भाजपमध्ये युद्ध; योगींचं नाव घेत इंडिया आघाडीच्या नेत्याचा बॉम्ब

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com