CM Pramod Sawant News : प्रमोद सावंतांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यासाठी गोव्याबाहेरून रचलं जातंय षडयंत्र?

Conspiracy against Pramod Sawant : धक्कादायक बाब म्हणजे या मोहिमेत सावंतांचे स्वपक्षीय नेतेच गुंतले असल्याचेही बोलले जात आहे
Pramod Sawant
Pramod SawantSarkarnama
Published on
Updated on

Goa Politics News : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात असल्याची माहिती समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मोहिमेत सावंत यांच्या पक्षातील काही नेते गुंतले असल्याचेही बोलले जात आहे. यामुळे गोव्यातील राजकारणात उलटसुलट चर्चांना उधाणही आलं आहे.

गोव्यातील वन क्षेत्रावर कुऱ्हाड चालविली जात आहे व वनक्षेत्राचे व्यावसायिकरण करण्यात येत आहे, अशी वृत्त मोहीम एका समाज माध्यमांवर चालविली जात असून, हा 50 हजार कोटींचा गफला असल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला गोव्यात मोठ्या प्रमाणात गफले व भ्रष्टाचार चालू असल्याचेही दर्शविणारी दुसरी मोहीम समाज माध्यमांवर सुरू आहे.

Pramod Sawant
Nahid Islam and Asif Mahmood News : बांगलादेशातील सत्ता परिवर्तनास कारणीभूत ठरलेल्या आंदोलनातील दोन विद्यार्थी नेते बनले थेट मंत्री!

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी माहिती देताना सांगितले की, 'मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(Pramod Sawant) यांच्या विरोधात खासगी वनक्षेत्राच्या रूपांतरासंदर्भात एक सूत्रबद्ध मोहीम सुरू आहे. ती मोहीम राज्याबाहेर तयार झाली; परंतु एकापाठोपाठ ती सुरू होण्यामागे राज्यातूनच निधी पुरविला गेला असल्याचे वृत्त आहे.'

तसेच, 'विधानसभा अधिवेशन सुरू असताना अचानक ही मोहीम सुरू करण्यात आली. त्यात समाज माध्यमांतील काही कार्यकर्ते गुंतले आहेत. मुख्यमंत्री हटाव मोहिमेचा संदर्भ त्यामागे आहे व या राजकीय हालचालींमागे कोण आहे याची माहिती आम्हाला आहे.' असंही सांगण्यात आलं आहे.

याशिवाय, 'गोव्याबाहेरून काही समाज माध्यमांवर वावरणारे प्रतिनिधी गोव्यात आणून त्यांना रीतसर मुख्यमंत्र्यांविरोधात माहिती दिली जाते आणि पैसाही पुरविला जातोय. ही प्रचार मोहीम राज्याबाहेरच्या मोबाईल क्रमांकांवरून सुरू आहे. गोव्यात भाजप सरकारविरोधात एवढा संघर्ष पहिल्यांदाच सुरू आहे.' असा आरोपही करण्यात आला आहे.

Pramod Sawant
PM Modi News : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींनी जीवे मारण्याची धमकी ; 'IB'कडून दोन तरूणांना अटक

काही मंत्री व स्वपक्षातील सदस्यच मोहिमेत गुंतल्याचा संशय -

१) मुख्यमंत्र्यांविरोधात सुरू असलेल्या या बदनामीकारक मोहिमेत काही विरोधी सदस्य गुंतले असू शकतात, परंतु त्यांना सत्ताधाऱ्यांमधल्यांचीच फूस आहे का? याची चाचपणी सुरू आहे.

२) भाजपच्या सुकाणू समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून या मोहिमेबद्दल नापसंती व्यक्त केली व पोलिसांत तक्रार करण्याची त्यांना विनंती केली.

३) सध्या राज्य मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेबाबत हालचाली तीव्र झाल्या आहेत. अनेकांच्या लालसा त्यामुळे जागृत झाल्याची चर्चा सुरू आहे.

४) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत लवकरच दिल्लीला जाणार असून मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार आहेत. पक्षश्रेष्ठी सध्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना गोव्याविषयी निर्णय घेण्यास अवधी नाही.

५) मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेत काही 'वजनदार' मंत्र्यांच्या खात्यांवर टाच येऊ शकते. त्याचा सुगावा लागल्याने ते तर या मोहिमेत सामील नाहीत ना? याची चाचपणी राज्याच्या नेतृत्वाने चालविली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com