योगींचे बघून सावंतांचाही मोठा थाट; गोव्यात नेत्रदिपक शपथविधीची तयारी

Pramod Sawant | Goa | Yogi Adityanath : अभूतपूर्व यशानंतर गोव्यात जंगी शपथविधी सोहळ्याची तयारी...
Pramod Sawant
Pramod Sawant Sarkarnama
Published on
Updated on

पणजी : अभूतपुर्व यशानंतर योगी आदित्यनाथ (Yogi adityanath) यांच्या शपथविधी सोहळ्याची उत्तर प्रदेशात सध्या जोरदार तयारी सुरु झाली आहे. २५ मार्च रोजी लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर हा सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, बहुतांश कॅबिनेट मंत्री, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, यांच्यासह सर्व भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय अयोध्येतील सर्व प्रमुख 50 संतांनाही निमंत्रण पाठवण्यात येणार आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या या शपथविधी पाठोपाठ गोव्यात प्रमोद सावंत यांनीही काहीशा अशाच भव्य-दिव्य आणि नेत्रदिपक शपथविधीची तयारी सुरु केली आहे. गोव्यात २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता ताळगावातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर सावंत यांचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं, विविध भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

Pramod Sawant
पक्षातून हकालपट्टी होताच गांधी परिवारावर टाकला लेटर बॉम्ब; काँग्रेसमध्ये खळबळ

गोव्यात सावंत यांच्यासह कॅबिनेट मंत्रिपदासाठी मगोपचे सुदिन ढवळीकर, अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड आणि डॉ. चंद्रकांत शेट्येंना संधी मिळणार हे जवळपास निश्चित आहे. तर माजी मुख्यमंत्री रवी नाईक, सुभाष शिरोडकर, मॉविन गुदिन्हो, बाबूश मोन्सेरात, विश्वजीत राणे, रोहन खंवटे आणि निलेश काब्राल यांचेही कॅबिनेट नक्की मानलं जात आहे. तर मुख्यमंत्रीपदावरुन हुलकावणी दिलेल्या विश्वजीत राणेंना दुसऱ्या क्रमांकाचं पद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com