Bihar Politics : 'नितीशकुमार पुन्हा भाजप सोबत जाणार!'

Bihar Politics : प्रशांत किशोर यांच्या दाव्यामुळे बिहिराच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे
NitishKumar
NitishKumarsarkarnama
Published on
Updated on

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा एनडीएमध्ये म्हणजेच भाजपसोत जाण्याच्या प्रयत्नांत असल्याचा खळबळजनक दावा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केला. नितीशकुमार (Nitish Kumar) सातत्याने भाजपच्या संपर्कात आहेत. ते केव्हाही भाजपसोबत जाऊ शकतात, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला.

प्रशांत यांच्या दाव्यामुळे बिहिराच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. नितीश यांनी सध्या राजदच्या मदतीने बिहारमध्ये आघाडी सरकार स्थापन केले. त्यातच प्रशांत किशोर यांनी हा दावा केल्यामुळे त्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

NitishKumar
Mallikarjun Kharge : खर्गे पहिली लढाई जिंकले; पण या आव्हानांचाही सामना करावा लागणार

प्रशांत किशोर म्हणाले, 2015 मध्ये तुम्ही मतदान केले. मात्र, हा माणूस 2017 मध्ये तुम्हाला फसवून पळून गेला. तुम्ही नितीश यांना माझ्याहून जास्त ओळखू शकत नाहीत. ते पुन्हा तुम्हाला धोका देऊन पळून जातील, मला काही येवो न येवो, पण निवडणूक लढवणे चांगले येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी बिहारमध्ये (Bihar) जनसुराज्य पदया काढली आहे. या यात्रेच्या निमित्ताने पश्चिम चंपारण्यच्या भेडीहरवा गावात त्यांनी नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही एनडीएला सोडचिठ्ठी दिली, तर मग ते पद का सोडत नाहीत? अशा तिखट सवाल त्यांनी केला. ते पद सोडा किंवा त्या खासदाराची हकालपट्टी करा, असेही ते म्हणाले.

प्रशांत यांचा रोख जदयू खासदार व राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांच्याकडे होता. राज्यसभेतील विधेयक पारित करण्यासाठी तुम्ही आपल्या पक्षाचा माणूस लावला आहे. बिहारमध्ये आघाडी स्थापन करून बिहारच्या जनतेला पुन्हा एकदा धोका देण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.

NitishKumar
Narendra Modi : यंदाची दिवाळी नोकऱ्यावाली, पंतप्रधान मोदी देणार ७५ हजार तरूणांना रोजगार!

नितीशकुमार यांनी भाजपसोबत (BJP) जाण्याचा पर्याय खुला ठेवल्याचे ऐकून आश्चर्य वाटेल. ते आपल्या पक्षाचे खासदार हरिवंश यांच्या माध्यमातून भाजपच्या संपर्कात आहेत. यावेळी प्रशांत किशोर यांनी यावेळी लालू प्रसाद यादव आणि नितीशकुमार यांच्यासह भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला.

दरम्यान, जदयूने प्रशांत किशोर यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. प्रशांत किशोर वेगवेगळे आरोप करून नेहमीच संभ्रमावस्था निर्माण करतात. त्यात कोणतेही तथ्य नाही. नितीशकुमार यापुढे केव्हाही भाजपसोबत जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी त्या संबंधीची घोषणा जाहीरपणे केली आहे, असे जदयूने स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com