Pune Loksabha By Election : मोठी बातमी! पुणे लोकसभा पोटनिवडणूक कुठल्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता; 'हे' आहे कारण

Pune News : पु्ण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा रिक्त झाली आहे.
Pune Loksabha By Election|
Pune Loksabha By Election| Sarkarnama
Published on
Updated on

Pune : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान साहित्याची माहिती मागविण्यात आली आहे. माहिती संकलित करण्यात येत असून बंगळुरुहून ४२०० ईव्हीएम मशीन्स पुण्यात आणण्यात आले आहे. कर्नाटकातील विधानसभा निवडणूक संपल्यानंतर बंगळुरुहून तब्बल ४२०० ईव्हीएम मशीन्स पुण्यात आणण्यात आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगा(Election Commission of India)ने मतदान केंद्रे, साहित्य आणि अन्य माहितीसाठी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. पुढील दोन दिवसांत जिल्हाधिकारी निवडणूक आयोगाला उत्तर देणार आहे. पुण्यातील पोटनिवडणुकीबाबत अद्याप कोणतीही सूचना प्राप्त झालेली नसल्याची माहिती पुणे उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे..

Pune Loksabha By Election|
Satyapal Malik On Modi Government: ..तर 'त्या' केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल; पुलवामा हल्ल्याबाबत सत्यपाल मलिकांचा मोठा खुलासा

भाजपकडून 'ही' नावं आहेत चर्चेत

गिरीश बापट( Girish Bapat)यांच्या निधनानं पुणे लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. या जागेवर आता पोटनिवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून या पोटनिवडणुकीसाठी तीन नावांची चर्चा सुरू आहे. या तीन जणांपैकीच एकाला तिकीट मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची चर्चा आहे.

पु्ण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा रिक्त झाली आहे. पुण्याची पोटनिवडणूक होणार नाही, असे बोलले जात होते. पुढच्या मे २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे ही निवडणूक न होता, ही जागा रिक्त ठेवली जाणार अशी चर्चा होती. मात्र प्रशासनाकडून या निवडणुकीसाठी तयारी करण्यात आहे. मतदान केंद्राची चाचपणी करण्यात येत आहे.

Pune Loksabha By Election|
Manohar Joshi Health Update: मोठी बातमी | माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची प्रकृती बिघडली; रूग्णालयात दाखल...

काँग्रेस, राष्ट्रवादीचा दावा

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं पुणे लोकसभे(Pune Loksabha By Election)ची जोरदार तयारी सुरु केली आहे. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसही पुणे लोकसभा लढविण्यासाठी आग्रही भूमिकेत असल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावाचे भावी खासदार म्हणून बॅनरही पुण्यात झळकले होते.

आता आघाडीकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या नावाची चर्चा आहे. यामुळे आता भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्याकडून कोणत्या नेत्यांनी लोकसभेचं तिकीट मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com