Prashant Kishor News : प्रशांत किशोर भडकले, काँग्रेसचा पराभव होणार म्हटल्याचे व्हिडिओ दाखवण्याचे दिले चॅलेंज

Congress : वर्तमानपत्रात आलेल्या बातमीला प्रशांत किशोर खोटी कशी ठरवू शकतात,असे काही नेटीझन्स म्हणत आहेत.
Prashant Kishor
Prashant KishorSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळणार याचा अंदाज राजकीय विश्लेषक, रणनितीकार बांधत आहेत. राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी भाजपला 400 जागा मिळणार नाहीत. मात्र, भाजप एकटा पुन्हा 300 जागा मिळवेल असा अंदाज व्यक्त केला आहे. योगेंद्र यादव Yogendra Yadav यांनी भाजपला 270 पेक्षा कमी जागा मिळतील यांचा दावा देखील त्यांनी फेटाळून लावला आहे. त्यात प्रशांत किशोर यांची करण थापर यांनी घेतलेली मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी 2022 मध्ये काँग्रेस हिमाचलमध्ये पराभूत होईल, असे आपण म्हटलोच नाही, असा दावा प्रशांत किशोर करताना दिसत आहेत.

Prashant Kishor
Jayant Sinha News : जयंत सिन्हांनी भाजपलाच पाडलं तोंडावर; खरमरीत पत्रातून दिलं सडेतोड उत्तर

करण थापर यांनी प्रशांत किशोर Prashant Kishor यांनी 2022 च्या निवडणुकीत काँग्रेस Congress पराभूत होईल, असे म्हटले होते. असा प्रश्न केला. त्या प्रश्नावर प्रशांत किशोर प्रचंड चिडले. मी असं काहीच म्हणालो नव्हतो. मी असं म्हटलो असल्याचा व्हिडिओ दाखवा अन्यथा माफी मागा, असे किशोर म्हणाले. त्यावर करण थापर यांनी वर्तमानपत्रात आलेली बातमी दाखवली.

त्यावेळी वर्तमानपत्रात काहीही छापून येऊ शकतं, असे म्हणत माझ्या वक्तव्याचा व्हिडिओ दाखवा, असे म्हणत प्रशांत किशोर आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले, तसेच असं काही मी म्हटलं असेल तर मी माझं काम सोडेल. पण जर तुम्ही माझ्याबाबत केलेले हे आरोप सिद्ध केले नाहीत तर तुम्हाला जाहीर माफी मागावी, असे देखील प्रशांत किशोर किरण थापर यांना म्हटले.

प्रशांत किशोर यांनी करण थापर यांना मुलाखतीत एकप्रकारे आव्हान देत , मी काही बोललो आणि मुलाखतीतून बाहेर पडलो असं बोलायची मी संधी देणार नाही. मी तुमच्यासारख्या इतर चारजणांबरोबरही सामोरं जाऊ शकतो, असे म्हटले. दरम्यान, प्रशांत किशोर यांच्या मुलाखतीवरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. वर्तमानपत्रात आलेल्या बातमीला प्रशांत किशोर खोटी कशी ठरवू शकतात,असे काही नेटीझन्स म्हणत आहेत.

Prashant Kishor
Pune Car Accident: पुणे अपघात प्रकरणी चौकशीसाठी आलेले आरोपीचे आजोबा म्हणाले, "आम्ही पोलिसांना..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com