भाजपला 2024 मध्ये पराभूत करणं शक्य! प्रशांत किशोर यांनी सांगितली त्रिसुत्री

बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपला याचआधारे पराभूत केल्याचे किशोर यांनी म्हटलं आहे.
Prashant Kishor Statement on 2024 Election
Prashant Kishor Statement on 2024 ElectionSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरू आहे. त्यात देशातील सर्वात मोठ्या उत्तर प्रदेशचाही समावेश आहे. तसेच विरोधकांनी आतापासून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठीही (Lok Sabha Election) मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यातच आता निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant kishor) यांनी या निवडणुकीत भाजपला (BJP) पराभूत करणं शक्य असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यासाठी तीन विरोधकांना तीन मुद्दयांवर काम करण्याचा सल्ला दिला आहे. (Prashant Kishor Statement on 2024 Election)

प्रशांत किशोर यांनी 'एनडीटीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत भाजपला 2024 मध्ये पराभूत करणं शक्य असल्याचं म्हटलं आहे. तीन मुद्यांवर विरोधकांनी रणनीती आखण्याची गरज आहे. भाजपचे हे तीनही मुद्दे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत फेल झाले होते. ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात मोठा विजय मिळवला. हिंदुत्व, अति राष्ट्रवाद आणि लोककल्याणकारी धोरणं हा मजबूत दृष्टीकोन भाजपनं तयार केला आहे, असे किशोर यांनी स्पष्ट केलं आहे. (Prashant Kishor News)

Prashant Kishor Statement on 2024 Election
चित्रा वाघ म्हणतात, राऊतांचं गणित लहानपणापासूनच कच्चं...गिरे तो भी टांगे उपर!

विरोधकांनी भाजपच्या या मुद्यांना लक्ष्य केल्याशिवाय विजय मिळवणे शक्य नाही. यातील किमान दोन मुद्यांवरून भाजपला घेरणं आवश्यक आहे. भाजपची लोकप्रियता केवळ हिंदुत्वावर टिकलेली नाही. भाजपची व्यापकता आणि लोकप्रियतेमागे आणखी दोन गोष्टींचे मोठे योगदान आहे. या दोन गोष्टी म्हणजे अति राष्ट्रवाद आणि लोककल्याणाची धोरणं. या दोन मुद्यांवर विरोधकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे किशोर यांनी सांगितलं.

किशोर म्हणाले, घरगुती आणि वैयक्तिक स्तरावर जर लोककल्याण, अति राष्ट्रवाद आणि हिंदुत्व एकत्र आले तर त्यावर विजय मिळवणे शक्य होत नाही. त्यामुळे विरोधकांनी कोणत्याही दोन गोष्टींवर ठोस भूमिका घेत लोकांपर्यंत गेल्यास भाजपच्या विजयाची शक्यता कमी होऊ शकते.

पश्चिम बंगाल (West Bengal) विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला. कारण तिथे अति राष्ट्रवाद हा मुद्दा अजिबात चालला नाही. त्याचा मुकाबला करण्यासाठी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी स्थानिक अस्मिता म्हणजे बंगाली अस्मितेचा मुद्दा प्रखरतेने मांडला. त्यामुळे त्यांना भाजपवर मात करत आली. पण जेव्हा राष्ट्रीय पातळीवरील निवडणुका येतात, तेव्हा राष्ट्रवादाचा मुद्दाच भाजपसाठी व्यापक बनतो, असेही किशोर यांनी नमूद केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com