Rajya Sabha: शालेय पाठ्यपुस्तकातून राज्यघटनेची प्रस्तावना हटवली? राज्यसभेत विरोधक आक्रमक

The Preamble to the Constitution was removed:धर्मेंद्र प्रधान यांनी शालेय पाठ्यपुस्तकातून राज्यघटनेची प्रस्तावना काढून टाकलेली नसल्याचा दावा केला. विरोधकांनी वर्तमानपत्रांच्या बातम्यांच्या आधारावर सभागृहात आरोप करू नये, असेही धर्मद्र प्रधान यांनी सांगितले.
Rajya Sabha
Rajya Sabha Sarkarnama
Published on
Updated on

इयत्ता तिसरी व सहावीच्या पाठ्यपुस्तकातून राज्यघटनेची प्रस्तावना (The Preamble to the Constitution was removed) काढून टाकल्याच्या मुद्यांवर राज्यसभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले.

विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शून्य प्रहारात याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. भाजप सरकारने नेहमीच संविधानात बदल करण्याचे सूचित करते, असे खर्गे म्हणाले. त्यावर कोणत्याही पाठ्यपुस्तकातून राज्यघटनेची प्रस्तावना काढून टाकलेली नसल्याचा खुलासा केंद्र सरकारने सभागृहात केला.

खर्गे यांच्या भाषणाला सत्तारुढ पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. भाजपच्या खासदारांनी घोषणा देण्यास सुरूवात केल्यानंतर सभापती जगदीप धनखड यांनी सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शालेय पाठ्यपुस्तकातून राज्यघटनेची प्रस्तावना काढून टाकलेली नसल्याचा दावा केला. विरोधकांनी वर्तमानपत्रांच्या बातम्यांच्या आधारावर सभागृहात आरोप करू नये, असेही धर्मद्र प्रधान यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिले. "काँग्रेसने राज्यघटनेवर सर्वाधिक हल्ले केले आहे. आणिबाणी आणून काँग्रेसने देशातील लाखो लोकांना मिसाखाली अटक केली होती. आरएसएसही देशभक्तांची संघटना आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यघटनेचे सर्वाधिक संरक्षण केले आहे. 26 नोव्हेंबरला संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतल्याचे सांगून जे. पी. नड्डा यांनी काँग्रेसवर टीका केली.

Rajya Sabha
Satej Patil: सतेज पाटलांनी उपसलं नव्या आंदोलनाचं हत्यार: 'शक्तीपीठ'साठी मुख्यमंत्र्यांचा लाडका ठेकेदार कोण?

प्रस्तावना ही राज्यघटनेचा आत्मा आहे. ही प्रस्तावना काढून टाकण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. महात्मा गांधी, पंडीत नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सरदार पटेल यांनी या देशाची राज्यघटना तयार करण्यासाठी त्याग केला आहे. या महान नेत्यांच्या त्यागातून देशाला राज्यघटना मिळाली आहे. परंतु या राज्यघटनेवर हल्ले करण्याचे कारस्थान आरएसएसच्या मदतीने मोदी सरकार करीत आहेत, असा आरोप खर्गे यांनी केला.

एनसीईआरटीच्या पुस्तकांमधून (NCERT Book) राज्यघटनेची प्रस्तावना काढून टाकल्याचाआरोप निराधार असल्याचे धर्मेंद्र प्रधान (Education Minister Dharmendra Pradhan) 'एक्स' या सोशल मीडियाद्वारे सर्व आरोप फेटाळत स्पष्टीकरण दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com