Kolhapur Political News : पूणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गवरील खराब रस्त्यावरील टोल वसुली बंद करण्याचे आंदोलन केल्यानंतर काँग्रेसचे आमदार आणि विधी मंडळाचे गटनेते सतेज पाटील यांनी पुन्हा एकदा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातून नव्या आंदोलनाचे नवे हत्यार उपसले आहे.
आमदार सतेज पाटील यांनी नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे. तीर्थक्षेत्र जोडण्यासाठी तयार करण्यात येणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणी केली आहे. या शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 ऑगष्टला सर्व जिल्ह्यात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असून विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यातील आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.
आज शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीची बैठक शासकीय विश्रामगृह येथे झाली. 'शक्तीपीठ मार्ग रद्द करावा हिच आमची मागणी आहे. नागपूर-रत्नागिरी हा पर्यायी मार्ग असून याबाबत आंदोलन सुरु आहे. पण सरकारने लोकप्रतिनिधीची बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. पण सरकारने पर्यावरण विभागाकडे मान्यतेसाठी पाठवलेल्या प्रस्तावावरून सिद्ध होते. सरकारने शेतकऱ्यांचा घात करावयाचा ठरवले आहे, असे सतेज पाटील म्हणाले.
सांगली-कोल्हापूरला महापुराचा कर्दनकाळ ठरणारा हा महामार्ग असणार आहे. शक्तीपीठ मार्गासाठी सरकारचा लाडका ठेकेदार कोण? पाहिले पाहिजे, असा आरोप सतेज पाटील यांनी करत शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी प्रत्येक जिल्हात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरण आंदोलन करण्याचा इशारा सतेज पाटील यांनी दिला आहे.
पुढील दहा दिवसात त्यासंदर्भात महापरिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहेत.आंदोलन कर्त्यावर गुन्हे दाखल करणे चुकीचं आहे. येणाऱ्या काळात वकिलांची परिषद घेऊन कार्यकर्त्यांना कायद्याचे ज्ञान देणार असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.