Goa Lok Sabha Election : खासदार ठरवण्यासाठी गोव्यात थ्री टायर सुरक्षाव्यवस्था

Goa Lok Sabha Election votes counting : गोव्याचा खासदार कोण ? उत्सुकता शिगेला, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. गोव्यातील लोकसभेच्या दोन जागांसाठीच्या मतमोजणीसाठीची तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात अली आहे.
Goa Lok Sabha 2024 Result
Goa Lok Sabha 2024 Resultsarkarnama

Goa News :  राज्यात मतमोजणी परिसरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला असून उत्तरेत ७०६ तर दक्षिणेत ६५१ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणीवेळी सुरक्षेसाठी थ्री टायर सुरक्षाव्यवस्था असणार आहे. बाहेरच्या गेटवर गोवा पोलिस,आतील भागात आयआरबी पोलिस आणि मतमोजणी केंद्राच्या बाहेर केंद्रीय शस्त्र पोलीस दलाचे जवान तैनात असतील. या मतमोजणीवेळी सीसी टीव्ही कॅमेरा तसेच प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणी अंती निकाल जाहीर केला जाणार आहे.

गोव्यातील लोकसभेच्या दोन जागांसाठीच्या मतमोजणीसाठीची तयारी पूर्ण झाली असून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणीच्या ठिकाणांची व सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. उत्तर गोवा मतमोजणी आल्तिनो पणजी येथील सरकारी तंत्रनिकेतनमध्ये तर दक्षिण गोवा मतमोजणी मडगाव येथील दामोदर महाविद्यालयात होणार आहे. दुपारपर्यंत मतमोजणी पूर्ण होऊन विजयी उमेदवारांचा जल्लोष सुरू होईल.

उद्याच्या मतमोजणीकडे गोमंतकीयांचे लक्ष्य लागले असून निकालाबाबत उत्कंठा लागली आहे. भाजपचे उमेदवार उत्तरेतून श्रीपाद नाईक हे सहाव्यांदा विक्रम प्रस्थापित करतील काय? खाण उद्योजक कुटुंबातील पल्लवी धेंपो या दक्षिणेतून पहिल्या महिला खासदार बनण्याचा मान मिळवतील काय ? याची उत्तरे उद्याच मिळणार आहेत.

या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना इंडी आघाडीसमोर टक्कर द्यावी लागली आहे. त्यामुळे निकाल कोणत्या बाजूने लागेल हे मतदारांनी दिलेल्या मतांच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. यावेळी पाचव्यांदा खासदार असलेले श्रीपाद नाईक यांना ही निवडणूक नेहमीप्रमाणे सोपी नव्हती. भाजपने दक्षिणेत महिला उमदेवार उतरवल्याने त्यांच्या प्रचारासाठी भाजप नेत्यांना तसेच आमदार व मंत्र्यांना घाम काढावा लागला होता. ही लढत भाजप विरुद्ध इंडी आघाडी अशीच झाली आहे

Goa Lok Sabha 2024 Result
Latur Lok Sabha Constituency Analysis : विलासराव, निलंगेकर, चाकूरकरांना पराभवाची धूळ चारणाऱ्या लातूरकरांचा नवा खासदार कोण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com