President Droupadi Murmu : गेल्या काही दिवसांपासून देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोलकाता येथील डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर लोकांनी आपला संताप, निषेध व्यक्त केला. तसेच बदलापूर येथील दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाला, याशिवाय देशात इतर राज्यातही अशा अनेक प्रकारच्या घटना पुढे आल्या आहेत. महिलांवरील लैंगिक अत्याचार हा महत्त्वाचा मुद्दा बनला.
महिलांवरील अत्याचार कमी होत नाहीयेत तसेच भारतात महिला सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. अशातच राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी कोलकाताच्या घटनेवर संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रपती म्हणाल्या की, कोणत्याही सुसंस्कृत समाजात बहिणी आणि मुलींवर असा अत्याचार होऊ दिला जाऊ शकत नाही. मी खूप निराश आणि भयभीत झाले आहे. आता बास झाले! अशा घटना विसरण्याची समाजाला वाईट सवय लागली आहे.
मुर्मू म्हणाल्या 'या घटनेमुळे मी खूप निराश आणि भयभीत झाले आहे. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. प्रत्येकाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आता स्वतःला कठीण प्रश्न विचारण्याची गरज आहे. अनेकदा घाणेरड्या मानसिकतेमुळे' महिलांना कमी ताकदवान समजले जाते.'
'निर्भया सामूहिक बलात्काराच्या घटनेला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या 12 वर्षात असे असंख्य बलात्कार झाले आहेत ज्यांचा समाजाला विसर पडला आहे. बलात्काराच्या असंख्य घटना समाज विसरत आहे हा चिंतेचा विषय आहे. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांना आपण सर्वांनी मिळून सामोरे जावे लागेल', अशी भूमिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मांडली.
'कोणताही सुसंस्कृत समाज आपल्या मुली आणि बहिणींवर असे अत्याचार करू देऊ शकत नाही. कोलकात्यात विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक आंदोलन करत असताना, गुन्हेगार इतरत्र सक्रिय होते. आता बास झालं...कोणताही पक्षपात न करता आपण आत्मपरीक्षण करून आणि चर्चा करणे महत्त्वाचे आहे,; असं द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.