Modi Goverment 3.0 : मोदींना सरकार स्थापनेसाठी राष्ट्रपतींकडून निमंत्रण ; 'दही-साखर'ही खाऊ घातली!

Narendra Modi Swearing Ceremony : रविवार 9 जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत
Modi and Murmu
Modi and MurmuSarkarnama

Narendra Modi and President Murmu : लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळालेली राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच 'एनडीए'चे नेते म्हणून निवड झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी नरेंद्र मोदी यांना केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी औपचारिकरित्या निमंत्रण दिले. एवढंच नाहीतर राष्ट्रपती मुर्मू यांनी स्वत: मोदींना दही-साखरही खाऊ घातली.

भारतीय संस्कृतीत एखादं महत्त्वाचं कार्य करण्याआधी संबंधित व्यक्तिला दही-साखर खाऊ घालणं शुभ मानलं जातं. आता मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. 9 जून रोजी सायंकाळी मोदींचा शपथविधा सोहळा(Narendra Modi Swearing Ceremony) पार पडणार आहे. तर राष्ट्रपतींनीही मुर्मू यांना पंतप्रधान पदाचं नियुक्तीपत्र सोपवलं आहे.

Modi and Murmu
PM Narendra Modi : मोदींनी खासदारांसमोर सांगितला ‘एनडीए’चा नवा अर्थ

याआधी NDAच्या नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली होती आणि मोदींना एनडीएच्या संसदीय दलाचे नेते निवडण्यासाठीचे समर्थन पत्र सोपवले होते. राष्ट्रपती मुर्मू(President Murmu) यांना भेटल्यानंतर मीडियाशी बोलताना मोदींनी म्हटले होते की, राष्ट्रपतींनी त्यांना पंतप्रधान पदी नियुक्त केले आहे.

Modi and Murmu
NDA Meeting : नितीश कुमार मोदींचे पाय धरू लागले अन् चिराग गळ्यात पडले! काय घडलं 'एनडीए'च्या बैठकीत?

याप्रसंगी मोदी म्हणाले होते की, ही 18वी लोकसभा ती स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे, जेव्हा देश 2047 मध्ये स्वातंत्र्यास 100 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करेल.

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये नवीन खासदारांसमोरच 'एनडीए' शब्दाचा नवा अर्थ सांगितला. नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स म्हणजे एनडीए. पण मोदींनी एनडीए म्हणजे न्यू इंडिया, डेव्हलप्ड इंडिया, अ‍ॅस्पिरेशनल इंडिया असे नामकरण केले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com