
Manipur Government Dismissed : मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. याआधी 9 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा त्यांनी राज्यात सुरू असले्ल्या जातीय हिंसाचाराच्या जवळपास दोन वर्षांनी दिला होता. या मुद्य्यासह अन्य मुद्य्यांवरूनही बीरेन सिंह यांच्यावर टीका सुरू होती.
तसेच काँग्रेस(Congress) त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत होती, तर भाजपमधील अनेक मंत्रीही त्यांच्यावर नाराज होते. अखेर दिल्लीत गृहमंत्री अमित शाह आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेवून आल्यानंतर बीरेन सिंह यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला होता. तेव्हापासूनच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं बोलल्या जात होतं.
संविधानानुसार कोणत्याही राज्याच्या विधानसभेच्या दोन सत्रांमध्ये सहा महिन्यांपेक्षा अधिक अंतर नसावे. मणिपूर(Manipur) विधानसभेबाबत बोलायचं झालं तर हा कालावधी बुधवारीच संपला आहे. याचबरोबर राज्यात कोणत्याही पक्षाने किंवा आघाडीने सरकार बनवण्याचा दावा सादर केला नव्हता, त्यामुळे आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली गेली आहे.
10 फेब्रुवारी पासून मणिपूर विधानसभेचे सत्र सुरू होणार होते. मात्र बीरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर यास स्थगित करण्याचे आदेश जारी केले गेले. हे सर्व तेव्हा घडले जेव्हा काँग्रेस विधानसभा सत्रात बीरेन सिंह(Biren Singh) यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत होती. मात्र आता सर्वच राजकीय घडामोडींना ब्रेक लागला आहे आणि राज्यात राष्ट्रपती शासन लागू झाले आहे.
कोणत्याही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर त्या राज्यातील शासन व्यवस्थेत अनेक बदल होतात. राज्याच्या प्रशासनावर राष्ट्रपतींचे नियंत्रण येते आण मग राष्ट्रपीत आपला प्रतिनिधी म्हणून राज्यपालांना प्रशासन चालवण्याची जबाबदारी देतात. पुढे राज्यपाल केंद्राच्या निर्देशानुसार राज्यात शासन चालवतात.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.