
Congress Vs AAP in Delhi Vidhan Sabha Election : दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच पराभूत झाली. काँग्रेसला या निवडणुकीतही आपलं खातं उघडता आलेलं नाही. परंतु तसं बघितलं तर आणि राजकीय अभ्यासकांच्या मते काँग्रेसने प्रत्येक त्या पराभवाचा एकप्रकारे बदला घेतला, ज्याबाबत दावा केला जात होता की काँग्रेस आम आदमी पार्टीमुळे पराभूत झाली.
आम आदमी पार्टीमुळे कधी काँग्रेसला(Congress) गोवा, गुजरात, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. आतात दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टील काँग्रेसमुळे मोठा फटका सहन करावा लागला आहे. काँग्रेसने सरळसरळ अनेक जागांवर आपच्या उमेदवाराचा पराभव केला आहे, ज्यामध्ये आपच्या अनेक दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे.
गोव्यात 2017च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस जिंकूनही हरली होती. काँग्रेसने तेव्हा 28.4 टक्के मतांसह 17 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपचा 32.5 टक्के मतांसह 13 जागांवर विजय झाला होता. आम आदमी पार्टी एकही जागा जिंकली नव्हती. मात्र 6.3 टक्के मतं आपने कापली होती. काँग्रेस अवघ्या तीन जागा कमी पडल्याने बहुमतापासून दूर राहिली होती आणि मग भाजपने(BJP) खेला केला. काँग्रेस नेत्यांचे म्हणणे होते की जर आम आदमी पार्टीने निवडणुकीत उडी घेतली नसतील किंवा काँग्रेसबरोबर राहिली असती तर बहुमताने सरकार आलं असतं.
2017च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा आम आदमी पार्टी गुजरातला गेली होती. तेव्हा काँग्रेसने भाजपला चांगली टक्कर दिली होती. आम आदमी पार्टीनेही(AAP) आक्रमकपणे निवडणूक लढवली होती. खरंतर जागा किंवा मतांच्या टक्केवारीत आपचा जास्त प्रभाव दिसला नव्हता. परंतु तेव्हाही काँग्रेसला याचा फटका बसला होता.
यानंतर 2022 च्या निवडणुकीतही आम आदमी पार्टी स्वबळावरच लढली होती. तेव्हा काँग्रेसची मतांची टक्केवारी घसरून 41.4 टक्क्यांवरून 27 टक्क्यांवर आली होती. तर आम आदमी पार्टी 12.92 टक्के मतं मिळवण्यात यशस्वी ठरली होती. 2022मध्ये काँग्रेसला सरळसरळ 60 जागांवर नुकसान झाले होते आणि ती अवघ्या 17 जागांवर गुंडाळली गेली होती. तिथेही काँग्रेसच्या पराभवाच्या कारणात आम आदमी पार्टीचा उल्लेख केला गेला. कारण, आपमुळे काँग्रेसला अनेक जागा गमावाव्या लागल्या होत्या.
उत्तराखंडच्या मागील विधानसभा निवडणुकीत आम आमदी पार्टीने पहिल्यांदा आपले नशीब आजमावले होते. काँग्रेसने तेव्हा आम आदमी पार्टीला भाजपची बी टीम म्हटले होते. विधानसभा निवडुकीत आम आदमी पार्टीने 3.31 टक्के मतं घेतली होती. तर काँग्रेसने 37.90 टक्के मतं मिळवली होती. याशिवाय भाजपने 44.30 टक्के मतं मिळवली होती. काँग्रेसचा उत्तराखंड निवडणुकीत पराभव झाला होता. या ठिकाणीही काँग्रेस आम आदमी पार्टीवर नाराज झाली होती.
हरियाणा विधानसभा निवडणूक-2024 लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यानंतर होत होती. लोकसभा निवडणूक आप आणि काँग्रेसने सोबत लढवली होती. हरियाणातही आघाडीची चर्चा होती, राहुल गांधी स्वत: आघाडीच्या बाजूने होते, सहा ते सात जागा आम आदमी पार्टीला देण्यास काँग्रेस तयार होती, मात्र केजरीवालांनी तुरुंगातून बाहेर येताच स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.
या निवडणुकी आम आदमी पार्टी भलेही कोणतीच जागा जिंकू शकली नाही. मात्र हरियाणातही काँग्रेसच्या पराभवाचे एक कारण आम आदमी पार्टी नक्कीच बनली. हरियाणा निवडणुकीत भाजपला 39.94 टक्के मतं मिळाली होती. तर काँग्रेसला 39.09 टक्के मतं मिळाली होती. आम आदमी पार्टीला 1.79 टक्के मतं मिळाली होती आणि अशाप्रकारे हरियाणातही आपमुळे काँग्रेसला फटका बसला.
दिल्ली विधानसभा निवडणूक 2025मध्ये काँग्रेस सलग तिसऱ्यांदा शून्यावर आली. परंतु काँग्रेसने अनेक जागांवर आम आदमी पार्टीचे उमेदवार पाडले. केजरीवाल, सिसोदिया, सौरभ भारद्वाज असे दिग्गज पराभूत झाले. केजरीवाल तर सरळसरळ काँग्रेसमुळे पराभूत झाल्याचे दिसून आले. जर काँग्रेसचे संदीप दिक्षीत नसते तर कदाचित केजरीवाल जिंकू शकले असते, सिसोदिया आणि सौरभ भारद्वाज यांचा देखील काँग्रेसमुळेच पराभव झाल्याचे दिसून आले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.