PM Modi on Yoga Day : श्रीनगरमधील दल सरोवराच्या किनारी पंतप्रधान मोदींनी केला योगा; म्हणाले, 'संपूर्ण जगाला...'

International Yoga Day 2024 : योग दिनाचा उत्साह आज संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे; संपूर्ण जगभरात योग करणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात सातत्याने वाढत आहे.
PM Modi Doing Yoga
PM Modi Doing YogaSarkarnama

Yoga Day 2024 Celebration in India : संपूर्ण जगभरात आज दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. भारतातही योग दिनाचा कमालीचा उत्साह दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही श्रीनगरमध्ये योग दिन साजरा करण्यास उपस्थित आहेत.

मोदीनी दल सरोवराच्या किनारी असलेल्या SKICC हॉलमध्ये सात हजारांहून अधिक जणांसोबत योग प्रात्याक्षिक केली. योग करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधितही केलं.

मोदी म्हणाले, 'योग केल्याने आपल्याला शक्ती मिळते, मनशांती मिळते. आज जगभरातील लोकांची योग हा प्राथमिकता बनलेला आहे. 2014 मध्ये मी यूएन मध्ये योग दिवसाचा प्रस्ताव मांडला होता. या भारताच्या प्रस्तावाला 177 देशांनी समर्थन दिले होते, हा एक विक्रमच होता. तेव्हापासून योग दिन नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे.

2015 मध्ये दिल्लीत 35 जणांनी एकत्रित योगा केला होता, हा देखील विश्वविक्रम आहे. मला मागील वर्षी यूएन मुख्यालयात योग दिवसाच्या आयोजनाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती, यामध्येही 130 पेक्षा अधिक देशांच्या लोकांनी सहभाग नोंदवला होता.'

PM Modi Doing Yoga
Narendra Modi News : आंतरराष्ट्रीय योग दिनाला अमेरिकेतून मोदींनी दिला संदेश; 'आपल्या ऋषीमुनींनी योगाची...'

याशिवाय पंतप्रधान मोदी म्हणाले, योगाची ही यात्रा अखंडपणे सुरू आहे. मला आनंद आहे की आज देशात शंभरपेक्षा अधिक संस्थांना मान्यता मिळाली आहे. परदेशातील दहा मोठ्या संस्थांनीही भारताकडून मान्यता मिळवली आहे.

आज संपूर्ण जगभरात योग करणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात सातत्याने वाढत आहे. योगाबद्दल आकर्षण आणि योगाचे फायदेही वाढत आहेत. सर्वसामान्यांनाही योगाचे महत्त्व लक्षात आलं आहे.

मी जेव्हा जगभरातील नेत्यांना भेटतो, तेव्हा योगाबाबत ते बोलणार नाही असं क्वचितच एखादेवेळी घडते. जगातील अनेक देशांमधील नागरिकांचा योग हा एक दिनचर्येचा भाग बनला आहे.

सौदीमध्ये तर योग हा तेथील शैक्षणिक यंत्रणेतही समाविष्ट करण्यात आला आहे. योगावर आज जगभरात संशोधनही होत आहे, जागतिक नेतेही योगावर बोलत आहेत. योगामुळे समजात सकारात्मक बदल घडत आहेत.

PM Modi Doing Yoga
Rahul Gandhi on PM Narendra Modi : मोदींनी रशिया-युक्रेन युध्द थांबवलं पण..! राहुल गांधी संतापले

पंतप्रधान मोदींनी हेही सांगितले की, जगातील सर्वच वरिष्ठ नेत्यांना जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते योगावर नक्कीच चर्चा करतात. मंगोलियामध्येही मंगोलिया योग फाउंडेशन अंतर्गत शाळा चालवल्या जात आहेत.

जगभरातील अन्य देशातही योगाचा प्रसार वाढत आहे. जर्मनीत आज जवळपास एक कोटी लोक योगसाधक बनले आहेत. याचवर्षी भारताने फ्रान्सच्या 101वर्षांच्या महिला योग प्रशिक्षकास पद्मश्री अवॉर्ड दिलेला आहे.

खरंतर त्या कधीच भारतात आलेल्या नाहीत, परंतु त्यांनी योगाचा प्रसारासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं आहे. आज जगभरातील मोठमोठ्या संस्था आणि विद्यापिठांमध्ये योगाचं महत्त्व सांगितलं जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com