Rahul Gandhi on PM Narendra Modi : मोदींनी रशिया-युक्रेन युध्द थांबवलं पण..! राहुल गांधी संतापले

NEET Paper Leak NTA PM Narendra Modi Congress Leader Rahul Gandhi : रद्द करण्यात आलेली नेट परीक्षा आणि नीट परीक्षेतील पेपरफुटीवर राहुल गांधींनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
Rahul Gandhi Narendra Modi
Rahul Gandhi, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : नीट पेपरफुटी आणि रद्द करण्यात आलेल्या नेट परीक्षेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान साधले. इस्त्रायल, गाझा, रशिया-युक्रेन युध्द थांबवल्याचा दावा पंतप्रधान मोदी करतात, पण ते पेपरफुटी थांबवू शकत नाहीत, अशी खोचक टीकाही राहुल यांनी केली.

नेट आणि नीट परीक्षेचा मुद्दा देशात चांगलाच तापला आहे. मोदी सरकारविरोधात काँग्रेसकडून शुक्रवारी देशभरात आंदोलन केले जाणार आहे. त्याआधी राहुल यांनी गुरूवारी मीडियाशी संवाद साधत सरकारला धारेवर धरले. देशातील शिक्षणव्यवस्थेवर नियोजित पध्दतीने कब्जा करण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी केला.

पेपरफुटीच्या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करायला हवी, असे सांगताना राहुल म्हणाले, युवकांच्या भविष्याशी खेळण्यात आले आहे. नीटचे पेपर फुटले आहेत. नेटच्या परीक्षेत गोंधळ झाला आहे. सर्व चौकशी व्हायला हवी. आम्ही संसदेतही हा मुद्दा उपस्थित करू, अशा इशारा राहुल यांनी दिला.

Rahul Gandhi Narendra Modi
NEET Paper Leak : सरकारी गेस्टहाऊस, खोली क्रमांक 404..! नीट पेपरफुटीत तेजस्वी यादव यांचा हात?

मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्याचा उल्लेख करत राहुल यांनी संपूर्ण देशात अशीच व्यवस्था करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. आम्ही त्याला रोखण्याचा प्रयत्न करू, असे राहुल म्हणाले. पेपरफुटी ही राष्ट्रीय आपत्ती आहे. सरकार त्याला रोखू शकत नाही. प्रत्येक परीक्षेतील पेपर फुटत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Rahul Gandhi Narendra Modi
BJP Politics : भाजपकडून दोन नेत्यांची हकालपट्टी; अण्णामलाई-तमिलीसाईंवर आगपाखड करणं भोवलं

भाजपचा कब्जा

देशातील शिक्षणव्यवस्थेवर भाजपच्या लोकांनी कब्जा केला आहे. ते प्रत्येक पोस्टवर आपल्या लोकांना आणत आहेत. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात पेपरफुटीनंतर करण्याची कारवाई आणि पेपरफुटी रोखण्यासाठी आवश्यक व्यवस्था तयार करण्याचे म्हटले होते. सरकारवर दबाव टाकून विरोध ही दोन काम करण्याचा प्रयत्न करेल, असे राहुल यांनी स्पष्ट केले.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com