PM Modi : 'तिसऱ्या कार्यकाळात देश एक नवा अध्याय लिहीन ही मोदींची गॅरंटी'

Loksabha Election Result and BJP : लोकसभा निवडणुकीती एनडीए आघाडीला मिळालेल्या बहुमतानंतर दिल्लीतील भाजप मुख्यलयातून पंतप्रधान मोदींनी देशाचे मानले आभार आणि दिले आश्वासन; जाणून घ्या नेमकं आणखी काय म्हणाले आहेत.
PM Modi
PM ModiSarkarnama
Published on
Updated on

PM Modi on Loksabha Election Result : लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. यामध्ये देशभरातून भाजप प्रणित एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशात मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील भाजप मुख्यालयात जल्लोष करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांचे आभार व्यक्त करत, त्यांच्या आगामी कार्यकाळाबाबत आश्वासनही दिले.

मोदी म्हणाले, 'तुमचा स्नेह, तुमचं प्रेम आणि या आशीर्वादासाठी मी सर्व देशवासीयांचा ऋणी आहे. आज मोठा शुभ दिवस आहे. या पावन दिवशी एनडीएचं लगातार तिसऱ्यांदा सरकार बनणं निश्चित आहे. आम्ही सर्वजण जनतेचे आभारी आहोत. देशावासियांनी भाजप, एनडीएवर पूर्ण विश्वास दर्शवला आहे. आजचा हा विजय जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय आहे. हा भाजपच्या संविधानावरील अतूट निष्ठेचा विजय आहे. हा विकसित भारताच्या निश्चयाचा विजय आहे. हा सबका साथ सबका विकास या मंत्राचा विजय आहे. हा भारतीयांचा विजय आहे.'

PM Modi
Chandrabapu Naidu Loksabha Result Analysis : जगनमोहनचा धुव्वा उडवला, विधानसभेत स्वबळावर बहुमत, आता चंद्राबाबूंकडे 'इंडिया'चे लक्ष

तसेच 'मी आज देशाच्या निवडणूक आयोगाचेही अभिनंदन करेन. निवडणूक आयोगाने जगातील सर्वात मोठी निवडणूक एवढ्या कौशल्याने पूर्णत्वास नेली. जवळपास १०० कोटी मतदार, ११ लाख पोलिंग स्टेशन्स, दीड कोटी मतदान कर्मचारी, ५५ लाख मतदान यंत्र प्रत्येक कर्मचाऱ्याने एवढ्या प्रचंड उकाड्यात आपले दायीत्व निभावले. आमच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्य भावनेचा शानदार परिचय दिला. भारताची निवडणूक प्रक्रिया, निवडणुकीची यंत्रणेच्या विश्वासर्हातेवर प्रत्येक भारतीयाला गर्व आहे.' असंही मोदी म्हणाले.

याचबरोबर 'भारताच्या लोकशाहीच्या सामर्थास जगासमोर आपण मोठ्या गर्वाने आपण प्रस्तुत केलं. यंदाही भारतात जेवढ्या लोकांनी मतदान केलं. ते अनेक मोठ्या लोकशाही देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. जम्मू-काश्मीरच्या मतदारांनी या निवडणुकीत विक्रमी मतदान करून अभूतपूर्व उत्साह दाखवला आणि जगभरात भारताल बदनाम करणाऱ्या ज्या शक्ती आहेत, त्यांना आरसा दाखवला आहे. मी देशाच्या प्रत्येक मतदारास, जनतेला विजयाच्या या शुभ मुहूर्तावर आदरपूर्वक नमन करतो आहे.' असं मोदींनी बोलून दाखवलं.

PM Modi
lok sabha election 2024 Result : अचूक रणनिती अन् राणेंची सरशी !

याशिवाय 'मी देशभरातील सर्व पक्ष, सर्व उमेदवारांचेही अभिनंदन करतो. सर्वांच्या सक्रीय भागिदारी शिवाय लोकशाहीचे विराट यश शक्य नाही. भाजपाचे, एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्ता सहकार्यासही मी मनापासून धन्यवाद देतो. या निवडणुकीचे या जनादेशाचे अनेक पैलू आहेत. 1962 नंतर पहिल्यांदाच एखादं सरकार आपले दोन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर तिसऱ्यांदा सत्तेत परत आले आहे.' असं मोदींना आवर्जून सांगितलं.

तसेच'ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाली. तिथे एनडीएला भव्य विजय मिळाला आहे. मग ते अरुणाचल प्रदेश, आंध्रप्रदेश, ओडिसा किंवा मग सिक्कीम असेल. या राज्यांमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. भाजप ओडिसामध्ये सरकार बनवणार आहे आणि लोकसभा निवडणुकीतही ओडिसाने चांगले प्रदर्शन केले आहे. हे पहिल्यांदाच होईल, जेव्हा महाप्रभू जगनाथ्थांच्या भूमीवर भाजपचा मुख्यमंत्री असेल.

भाजपने केरळमध्येही जागा जिंकली आहे. आमच्या केरळ कार्यकर्त्यांनी खूप बलिदान दिलं आहे. अनेक पिढ्यांपासून ते संघर्षही करत होते आणि जनसामान्याची सेवाही करत होते. पिढ्यांना पिढ्या ज्याची प्रतीक्षा होती, ते आज संपली आहे.' अशा शब्दांत मोदींनी राज्यांमधील निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com