Chandrabapu Naidu Loksabha Result Analysis : जगनमोहनचा धुव्वा उडवला, विधानसभेत स्वबळावर बहुमत, आता चंद्राबाबूंकडे 'इंडिया'चे लक्ष

Loksabha Election 2024 : भाजपसोबत आघाडी केलेल्या चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळवले. लोकसभेच्या 15 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. सत्तास्थापनेची संधी दिसली तर इंडिया आघाडी चंद्राबाबू नायडू यांना आपल्या कळपात घेण्यासाठी प्रयत्न करणार, हे निश्चित मानले जात आहे.
Chandrabapu Naidu
Chandrabapu Naidu Sarkarnama

सर्व 'एक्झिट पोल'ना खोटे ठरवत इंडिया आघाडीही सत्तास्थापनेच्या जवळ जाईल, असे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसकडून जुन्या मित्रांना साद घालण्याची तयारी सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून नितीशकुमार यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याचे सांगितले जात आहे. नितीशकुमार यांच्यानंतर इंडिया आघाडी आता तेलुगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्रीचंद्राबाबू नायडू यांच्याकडे मोर्चा वळवत त्यांना साद घालण्याच्या तयारीत आहे.

लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच आंध्र प्रदेशात विधानसभेचीही निवडणूक झाली. सत्ताधारी वायएसआर काँग्रेसचा दारून पराभव करून चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीने (टीडीपी) स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवले आहे. आंध्र प्रदेशात टीडीपी, भाजप आणि जनसेना अशी आघाडी होती. विधानसभेच्या 175 जागा असलेल्या आंध्र प्रदेशात भाजप (BJP) सात जागांवर आघाडीवर असून, जनसेना पक्षाचे उमेदवार 21 जागांवर आघाडीवर आहेत. एकट्या टीडीपीच्या उमेदवारांनी 122 जागांवर आघाडी घेतली आहे. सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला केवळ 25 जागा मिळत आहेत. आंध्र प्रदेशात टीडीपीचे उमेदवार 15 लोकसभा मतदारसंघांत आघाडीवर आहेत.

Chandrabapu Naidu
Lok Sabha Election Result NDA Vs India Alliance : यूपी ते बंगाल… ‘या’ राज्यांमध्ये चुकलं भाजपचं गणित!

लोकसभा निवडणुकीत भाजपने चारसौ पारची घोषणा दिली होती, मात्र त्यापासून भाजप खूप दूर राहणार आहे. याउलट इंडिया आघाडीने चमकदार कामगिरी केली आहे. सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये चुरस निर्माण होणार आहे. घटकपक्ष दूर जाऊ नयेत, यासाठी एनडीएने हालचाली सुरू केल्या आहेत, तर, दुसरीकडे दुरावलेले मित्र जोडण्यासाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला आंध्रप्रदेशात स्वबळावर बहुमत मिळाले आहे. त्यामुळे त्यांना आघाडी केलेल्या भाजप किंवा जनसेनेच्या आधाराची गरज राहिलेली नाही. अशा परिस्थित त्यांच्या पक्षाला लोकसभेच्याही 15 जागा मिळत असल्याचे दिसत आहे.

Chandrabapu Naidu
Lok Sabha Election Result NDA Vs India Alliance : यूपी ते बंगाल… ‘या’ राज्यांमध्ये चुकलं भाजपचं गणित!

नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू यांच्याशी आपले बोलणे झालेले नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ असा नाही की यानंतरही ते त्यांच्याशी संपर्क साधणार नाहीत. राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. आज रात्रीपर्यंत चित्र स्पष्ट झाले आणि इंडिया आघाडी सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत आली तर याची प्रचिती येऊ शकते. सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली तर इंडिया आघाडी ती सोडणार नाही. यातून मग नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू यांना चांगली ऑफर मिळू शकते. शरद पवार यांचे देशभरातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. अशा अटीतटीच्या परिस्थितीत ते इंडिया आघाडीसाठी संकटमोचक ठरू शकतात. त्यामुळे एक-दोन दिवसांत धक्कादायक घडामोडींची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com