पंतप्रधानांसह सोनिया गांधीनी केले म. गांधी आणि लाल बहादूर शास्त्रींना अभिवादन

गांधी जयंतीला मी आदरणीय बापूंना नमन करतो. त्याची उदात्त तत्त्वे जागतिक स्तरावर संबंधित आहेत आणि लाखो लोकांना शक्ती देतात.
PM Narendta Modi
PM Narendta Modi Twitter/@PMO India
Published on
Updated on

राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आणि स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shahtri) यांची आज जयंती. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज राजघाट येथे त्यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आज देशभरातील विविध नेतेमंडळींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन केले.

PM Narendta Modi
'लायकीत राहा, केंद्रातली सत्ता गेल्यावर परदेशात पळून जायची वेळ येईल'

तत्पुर्वी, त्यांनी ट्विट करुनही त्यांनी महात्मा गांधींना अभिवादन केले. ''पूज्य बापूंचे जीवन आणि आदर्श देशातील प्रत्येक पिढीला कर्तव्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देत राहतील. गांधी जयंतीला मी आदरणीय बापूंना नमन करतो. त्याची उदात्त तत्त्वे जागतिक स्तरावर संबंधित आहेत आणि लाखो लोकांना शक्ती देतात.''

तसेच, आणखी एक ट्विट करत त्यांनी लाल बहादूर शास्त्रींनाही अभिवादन केले. "माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजींचीमूल्ये आणि तत्त्वांवर आधारित त्यांचे जीवन देशवासियांसाठी नेहमीच प्रेरणास्त्रोत राहील.'' असेही त्यांनी लिहीले.

पंतप्रधान मोदींशिवाय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहूल गांधी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही राजघाटवर पोहोचून महात्मा गांधींना अभिवादन केले. राजघाट येथे सर्वधर्म प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या कार्यक्रमात उपस्थित होते. सर्व मान्यवर उपस्थित राहून गांधीजींना आठवणींना उजळा दिला.

CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray Twitter/@CMO Maharashtra

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले अभिवादन

'जय जवान, जय किसान' घोषणेतून चैतन्य निर्माण करणारे भारतमातेचे महान सुपुत्र माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांना विनम्र अभिवादन. - मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना या स्वातंत्र्याचे शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मरण करून वंदन करणे आद्य कर्तव्य आहे. गांधीजी यांचा जीवनमार्ग हाच एक संदेश आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा गांधींना जयंतीनिमित्त अभिवादन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com