कोल्हापूर : 'पक्षाविषयी, ‘मातोश्री’(Matoshree)विषयी काहीही बोलू नको, लायकीत राहा. मुंबईत कुठेही या शिवसेना (Shivsena)काय आहे ते दाखवून देऊ,' असे आव्हान शिवसेनेचे कोल्हापूरचे (Kolhapur) माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी दिले आहे. कोल्हापूरात बोलताना त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांना आव्हान दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोमय्या शिवसेना आणि ठाकरे सरकारवर टिका करताना दिसत आहेत. अशात आता क्षीरसागर यांनी आक्रमक पवित्रा घेत सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
“किरीट सोमय्या ही मूर्ख व्यक्ती आहेत. त्यांना त्यांची लायकी शिवसेननं दाखवून दिली आहे. केंद्रातली सत्ता गेल्यावर परदेशात पळून जायची वेळ येईल,अशा शब्दात क्षीरसादर यांनी सोमय्यांवर निशाणा साधला आहे. तसेच, केंद्र सरकारकडून संरक्षण घेऊन फिरण्यापेक्षा मुंबईत कुठेही या शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ." असे म्हणत त्यांना थेट आव्हानही दिलं आहे.
किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना, नक्की काय आहे प्रकरण?
किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले, त्यानंतर आपण शांत बसणार नसल्याचं त्यांनी म्हटल होतं. हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा थेट शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे वळवला. किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावरही घोटाळ्याचे आरोप केले.
खरतरं 2014च्या लोकसभा निवडणुकीवेळी असलेली युती शिवसेना-भाजपने त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोडली. लोकसभा निवडणुकीपूर्वी सोमय्यांनी मातोश्री’वर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर शिवसेनेने निवडणूकीत सोमय्यांचं तिकीट कापण्यासाठी भाजपला भाग पाडलं. विधानसभा निवडणूकीनंतर शिवसेना-भाजप वेगळे झाले. त्यानंतर पुन्हा सोमय्यांनी ‘मातोश्री’ला टार्गेट करायाला सुरुवात केली.
हसन मुश्रीफांनंतर यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांनी रश्मी ठाकरेंवर आरोप करायला सुरुवात केली. 'उद्धव ठाकरेंची दडपशाही सुरु आहे, उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये 19 बंगल्यांचा घोटाळा केला असून आपण त्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहोत, ठाकरे कुटुंबाकडे 19 बंगले आहेत. हे बंगले कुठून आले? उद्धव ठाकरेंनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने बंगले घेतले आहेत, असे गंभीर आरोप सोमय्यांनी केले.
इतकेच नव्हे तर, ''उद्धव ठाकरेंनी हिरवा रंग धारण करावा, आम्ही हिंदू म्हणून रोखता? मला विसर्जनापासून, आंबेबाईच्या दर्शनापासून रोखले, उद्धव ठाकरेंचा उद्धटपणा चालणार नाही. आम्ही हायकोर्टात जाणार, चुकीच्या आदेश देणाऱ्या मुंबई पोलिसांवर, मुंबई पोलिस कमिशनरवर कारवाई व्हावी, असे आरोप किरीट सोमय्या किरीट सोमय्यांनी केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.