Narendra Modi On Congress : ''...म्हणूनच काँग्रेसचे ४०० चे ४० खासदार झाले !''; पंतप्रधान मोदींनी डिवचले

PM Narendra Modi In Parliament : 'मोहब्बत की दुकान नाही तर लूट की दुकान'
Narendra Modi On Congress
Narendra Modi On Congress Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi : केंद्रातील भाजप सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. त्यावर गेल्या दोन दिवसांपासून लोकसभेत चर्चा सुरू आहे. गुरूवारी चर्चेचा शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे. त्यामुळे या मतदानाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले होते. तसेच मोदी काय बोलणार याकडेही संपूर्ण देशाचं लक्ष लागलेले होते. पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच काँग्रेसवर टीका करताना ४०० चे ४० खासदार लोकसभेत झाले असा आरोपही मोदींनी यावेळी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi ) गुरूवारी विरोधी पक्षांना लोकसभेत प्रत्युत्तर दिले. अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने विरोधकांनी केलेल्या आरोपांचा मोदींनी आपल्या भाषणात चांगलाच समाचार घेतला. मोदी म्हणाले, काँग्रेस इतकी अहंकारी आहे की त्यांना जमीन दिसत नाही. पण लंका हनुमानाने नाहीतर अहंकाराने जाळली. काँग्रेसच्या अहंकारामुळेच त्यांचे ४०० चे ४० खासदार झाले असा घणाघातही पंतप्रधान मोदींनी लोकसभेत केला.

काँग्रेसला झोपेत, स्वप्नातही मोदीच दिसतात. पण २०२४ ला लोक विरोधीपक्षांना झोप लागू होणार नाही.याचवेळी राहुल गांधींवर निशाणा साधताना 'मोहब्बत की दुकान नाही तर लूट की दुकान' असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले.

Narendra Modi On Congress
PM Narendra Modi Speech : विरोधकांच्या 'इंडिया'वर मोदींचे घाव; ही तर घमेंडी आघाडी...

काँग्रेसला स्वत:चा विचार नाहीच. काँग्रेसच्या नेत्यांनी सर्व ठिकाणी आपले नावे दिली. सरकारी योजना त्यांच्या नावावर चालवली. रस्ते, रुग्णालये, शैक्षणिक संस्थांना त्यांची नावे दिली. परंतू, काम दिसले नाही. त्या योजनांमध्ये हजारो कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला. काँग्रेसची एकही वस्तू आपला नाही. काँग्रेसचा निवडणूक चिन्हसुद्धा त्यांचे नाही. ते सुद्धा दुसरीकडून घेतले आहे. काँग्रेसचे विचारसुद्धा त्यांचे नाही. गांधी नावसुद्धा त्यांचे नाही. ते नावही चोरले. काँग्रेस पक्षाचे संस्थापक विदेशी होते असा चिमटाही मोदींनी यावेळी विरोधकांना काढला.

काँग्रेसकडे स्वतःचं असं काहीच नाही...

देशातल्या अनेक राज्यात काँग्रेसला जनतेने नाकारलं असल्याचं ते म्हणाले. काँग्रेस(Congress)कडे स्वतःचं असं काहीच नाही, पक्ष नाही, विचार नाही, चिन्ह नाही, एवढंच काय तर मतांसाठी काँग्रेसने गांधी नावही चोरल्याची टीका पंतप्रधानांनी केली. तसेच लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर आणि काँग्रेसवर टीका केली.

Narendra Modi On Congress
PM Narendra Modi Speech : विरोधकांच्या 'इंडिया'वर मोदींचे घाव; ही तर घमेंडी आघाडी...

काँग्रेसला घराणेशाहीला आवडतो

काँग्रेसमध्ये परिवार वाद आहे. या परिवारवादाला महात्मा गांधी(Mahatma Gandhi) यांनी विरोध केला. सरदार पटेल यांनीही परिवार वादाला विरोध केला. परंतु काँग्रेसने आपल्या बेटा, बेटीसाठीच काम केले. काँग्रेसने महान नेत्यांचे अधिकार नेहमी दाबवून ठेवले. ज्यांनी दरबारवादाला जोडले नाही, अशा कितीतरी महान नेत्यांना काँग्रेसने मोठे होऊ दिले नाही.काँग्रेसला परिवारवाद आवडतो अशी टीकेची झोडही पंतप्रधान मोदींनी यावेळी उठवली.

मी विरोधी पक्षातील माझ्या मित्रांप्रती शोक व्यक्त करू इच्छितो. काही दिवसांपूर्वी तुम्ही मिळून दीड-दोन दशके जुन्या 'यूपीए'वर बंगळुरूमध्ये अंतिमसंस्कार केले. लोकशाही वर्तनानुसार मला सहानुभूती व्यक्त करायची आहे, असा टोला मोदींनी लगावला. विरोधी आघाडीमध्ये अनेक नेते आहेत. त्यातील प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचे आहे, असा चिमटा मोदींनी काढला.

Narendra Modi On Congress
PM Modi In Parliament: मोदी तेरी कब्र खुदेगी; विरोधकांची ही घोषणा मोदींचे टॉनिक

राजकारणासाठी विरोधकांनी 'इंडिया' तोडल्याचा गंभीर आरोप मोदींनी विरोधकांवर केला. ही इंडियाची आघाडी नसून, ती घमंडी आघाडी असल्याचे मोदींनी आपल्या खास स्टाईलमध्ये विरोधकांना सुनावले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com