PM Modi In Parliament: मोदी तेरी कब्र खुदेगी; विरोधकांची ही घोषणा मोदींचे टॉनिक

PM Narendra Modi In Loksabha : "इतके वर्ष सत्तेत असूनही काँग्रेस अनुभवशुन्य आहे..."
PM Narendra Modi In Parliament
PM Narendra Modi In Parliament Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: सत्ताधारी विरोधकांमधील संघर्षात नेहमीच अपशब्दांची फेकाफेक केली जाते. त्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी बाकांवरच्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जणू स्पर्धा रंगल्याचे पाहायला मिळते. आता विरोधकांच्या टीका-टिप्पणीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना चांगलेच सुनावले.

माझ्यासाठी अपशब्द वापरताना विरोधक नवनव्या 'डिक्शनरी' शोधून, त्याच चाळत असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी तेरी कब्र खुदेगी, अशी घोषणा काही लोकांची आवडती बनली आहे, असे सांगून याआधी आपल्याबाबत काँग्रेस नेत्यांनी काढलेले अपशब्द सांगत विरोधकांना उघडे पाडण्याचा प्रयत्न मोदींनी केला.

PM Narendra Modi In Parliament
PM Modi In Parliament: भाजप सर्व रेकॉर्ड तोडून 2024 ला पुन्हा सत्ता काबीज करणार; मोदींनी व्यक्त केला विश्वास

मोदी सरकारविरोधात विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेवरील शेवटच्या दिवशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत सरकारची बाजू मांडत विरोधकांना चांगलेच सुनावले.

"मोदी तेरी कब्र खुदेगी, अशी घोषणा काही लोकांची आवडती बनली असून इतके वर्ष सत्तेत असूनही काँग्रेस अनुभवशुन्य आहे. काँग्रेसने देशात गरीबी वाढवली. काँग्रेसच्या काळात देश कंगाल झाला. काँग्रेसकडे नीती, नियत, दूरदृष्टी नाही", असा हल्लाबोल मोदींनी विरोधी पक्षांवर केला.

PM Narendra Modi In Parliament
PM Narendra Modi In Loksabha : मोदींनी अविश्वासाच्या ठरावातील हवाच काढली; म्हणाले, '' हा अविश्वास प्रस्ताव नाही तर...''

"आम्ही ज्या-ज्या योजना आणल्या, त्यावर विरोधकांनी टीका केली. विरोधकांना भारताच्या सामर्थ्यांवर विश्वास नाही. पण पाकिस्तान जे बोलेल, त्यावर यांचा विश्वास होतो. भाजपने देशातील जनतेला घोटाळेविरहीत सरकार दिले. देशातील गरीबी कमी केली. 2028 जेव्हा अविश्वास प्रस्ताव आणाल, तेव्हा भारत जगात तिसऱ्या क्रमकांवर असेल", असा घाणाघात करत मोदींनी विरोधकांना डिवचले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com