PM Narendra Criticism On Congress : भारजीय जनता पार्टीचा ४४ वा स्थापना दिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी विविध उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन भाजपकडून करण्यात आलं आहे. याचदरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाजपच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे.यावेळी मोदींनी विरोधकांवर हल्लाबोलही केला आहे.
भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदीं(Narendra Modi)नी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि घराणेशाहीवर सडकून टीका केली आहे. मोदी म्हणाले, द्वेषाने पछाडलेले लोक आज वारंवार खोटं बोलत आहेत. हे लोक नैराश्याने ग्रासले आहेत. त्यामुळेच ते मोदी तुमची कबर खोदू असं म्हणत आहेत. ते माझी कबर खोदण्याच्या कामाला लागले आहेत.
पण दलित, आदिवासी, महिला, माता, तरुण आणि गरीब लोक भाजपच्या पाठी खंबीरपणे उभे आहेत. भाजपचं कमळ फुलवत आहेत, हे या लोकांना माहीत नाहीये असा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चढवला आहे.
२०१४ पूर्वी देशात बादशाही मानसिकता..
पंतप्रधान मोदींनी काँग्रेस(Congress)वर घराणेशाहीवरुन निशाणा साधला. मोदी म्हणाले, देशातील राजकीय पक्ष घराणेशाही, वंशवाद, जातीवादाचं राजकारण करतात. पण भाजपचं हे कल्चर नाही. आपण सर्वांना सोबत घेऊन पुढे जात आहोत. देशातील माता, भगिनींचा विश्वास भाजपच्या दिशेने वाढला आहे.
तसेच 2014नंतर केवळ सत्ता बदल झाला नाही तर लोकांनी नेहमीच देशातील जनतेला गुलाम बनवलं. या सर्व बादशाही मानसिकतेच्या लोकांना जनतेने सत्तेतून हद्दपार केलं आहे, असंही ते म्हणाले.
...यासाठी हनुमानासारखं कठोर व्हावं लागतं!
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देताना मोदी म्हणाले, भ्रष्टाचार,घराणेशाही मोडीत काढण्यासाठी हनुमानासारखं कठोर व्हावं लागतं. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हा मंत्र घेऊनच भाजप मार्गक्रमण करत आहे. देशाच्या नावावर राजकारण करणं ही भाजपची संस्कृती नाही असं मोदी म्हणाले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.