Karnataka Election : शिरहट्टी मतदारसंघात जिंकलेला पक्ष कर्नाटकात सरकार बनवतो; यंदा वातावरण काय?

Karnataka election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत आहे.
Karnataka election 2023
Karnataka election 2023 Sarkarnama

Karnataka Assembly Election News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत आहे. काँग्रेसने दोन उमेदवारी याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपही (BJP) आपली उमेदवारी यादी लवकर जाहीर करणार आहे. मात्र, कर्नाटकमध्ये असा एक मतदारसंघ आहे, की या मतदारसंघात जो पक्ष जिंकतो तो पक्ष राज्याच्या राजकारणात सत्तेवर येतो.

अशी अनेक वर्षांची परंपरा आहे. येथील मतदारांना राज्यात वारे कोणत्या दिशेला आहे हे समजते. गेल्या १२ निवडणुकीत हाच कल साधारण दिसतो. कित्तुर-कर्नाटक विभागातील शिरहट्टी हा तो मतदारसंघ आहे. गदग जिल्ह्यात या मतदार संघाचा समावेश होतो. १९७२ च्या निवडणुकीपासून ही परंपरा खंडीत झालेली नाही.

Karnataka election 2023
BJP foundation day : वाजपेयींच्या त्या भाषणांची आठवण करुन देत पवारांनी दिल्या भाजपला खोचक शुभेच्छा!

पहिल्यांदा काँग्रेसनेही (Congress) ही जागा जिंकली, त्यावेळी देवराज उर्स यांनी राज्यात सरकार स्थापन केले. १९८३ पर्यंत हा मतदारसंघ काँग्रसकडेच होता. त्यानंतर १९८३ मध्ये काँग्रेस आमदार फकीरप्पा यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि निवडणुकीत विजयी झाल्यावर त्यांनी जनता पक्षाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री झाले. पुन्हा १९८९ मध्ये काँग्रेसने ही जागा जिंकली आणि राज्यात सरकार स्थापन झाले. भाजपने २००८ मध्ये पहिल्यांदा येथून भाजप उमेदवाराचा विजय झाला आणि पक्षाला सत्ता मिळाली.

पक्षाचे उमेदवार आर. एस. लामणी यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता. 2008 मध्ये भाजपने दक्षिणेकडील राज्यातील पहिले बहुमतातील सरकार कर्नाटकमध्ये स्थापन झाले. २०१३ मध्ये येथे काँग्रेसचे उमेदवार सिदलिंगाप्पा यांनी भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला, त्यावेळी काँग्रेसचे सिद्धरामैय्या मुख्यमंत्री झाले.

Karnataka election 2023
Karnataka Election : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; भाजप-जेडीएसच्या ३ बंडखोरांसहित ४२ जणांना उमेदवारी !

त्यानंतर पुन्हा २०१८ मध्ये भाजप उमेदवाराने येथे विजय मिळवला. मात्र, राज्यात धर्मनिरपेक्ष जनता दल तसेच काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर १४ महिन्यांत सरकार कोसळे आणि कर्नाटकमध्ये पुन्हा भाजप सरकार सत्तारुढ झाले. त्यामुळे या मतदार संघात विजयी झालेला पक्ष राज्यात सत्तेत येतो, असे सांगितले जाते. त्यामुळे यंदा हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला झुकते माप देतो त्याची उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com