PM Narendra Modi In Loksabha : मोदींनी अविश्वासाच्या ठरावातील हवाच काढली; म्हणाले, '' हा अविश्वास प्रस्ताव नाही तर...''

PM Narendra Modi In Parliament : केंद्रातील भाजप सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे.
PM Narendra Modi |
PM Narendra Modi | Sarkarnama
Published on
Updated on

Delhi : केंद्रातील भाजप सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. त्यावर गेल्या दोन दिवसांपासून लोकसभेत चर्चा सुरू आहे. गुरूवारी चर्चेचा शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे. त्यामुळे या मतदानाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले होते. तसेच मोदी काय बोलणार याकडेही संपूर्ण देशाचं लक्ष लागलेले होते. पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) गुरूवारी विरोधी पक्षांना लोकसभेत प्रत्युत्तर दिले. अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने विरोधकांनी केलेल्या आरोपांचा मोदींनी आपल्या भाषणात चांगलाच समाचार घेतला. या भाषणात त्यांनी विरोधकांच्या मणिपूरची हिंसा,सरकारने केलेले प्रयत्न आणि सध्याची परिस्थिती अविश्वास प्रस्ताव यावर भाष्य करतानाच विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.अविश्वासाचा ठराव हा सरकारविरोधात नाही तर तो विरोधकांबाबतचा असल्याचे सांगून मोदींनी हा ठराव विरोधकांच्याच अंगावर ढकलला.

PM Narendra Modi |
Satara Breaking News : दरे गावाकडे निघालेले मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर साताऱ्यात उतरले, प्रशासनाची तारांबळ

पंतप्रधान मोदी काय म्हणाले..?

मोदी म्हणाले,तीन दिवसांपासून सभागृहात अनेक मान्यवरांनी आपले भाषणे केले. त्यातील काही भाषणे ऐकलेही. जनतेने आमच्यावर वारंवार विश्वास वर्तवला आहे. यामुळे देशातील जनतेचं आभार व्यक्त करतो. देव खूपच दयावान असतो. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून इच्छापूर्ती करत असतो. मी देवाचा आशीर्वाद मानतो, की त्यांनी विरोधकांना अविश्वास प्रस्ताव मांडण्याची बुद्धी दिली. 2018 मध्ये देवाने असंच काहीसं केलं होतं. विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. हा प्रस्ताव आमची परीक्षा नाही तर विरोधकांची परीक्षा आहे. या प्रकारचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ असतो. झालेही तसेच...( No Confidence Motion आणला होता.

जेव्हा २०१८ ला मतदान झालं तेव्हा विरोधकांकडे तितकी मतं होती तितकीही त्यांना पडली नाही. इतकंच नाही तर आम्ही जनतेत गेलो तेव्हा एनडीएला सर्वाधिक मतं पडली आणि सत्तेत आलो. एकप्रकारे विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ असतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

2024 लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, आज मी बघत आहे की, एनडीए आणि भाजपा 2024 मध्ये निवडणुकीत सर्व विक्रम मोडीत काढेल. भव्य विजयासह आणि जनतेच्या आशीर्वादने पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वासही मोदींनी यावेळी व्यक्त केला.

मात्र, २०२३ ला विरोधक अविश्वास प्रस्ताव आणतील असे त्याचवेळी सांगितले होते. पण आजचा अविश्वास प्रस्ताव नाहीतर विरोधकांचीच 'फ्लोवर टेस्ट' आहे असा टोलाही मोदींनी यावेळी लगावला.

PM Narendra Modi |
Rahul Gandhi Flying Kiss : राहुल गांधींचा 'फ्लाईंग किस' मोदींना पुन्हा निवडून देणार; सुधीर मुनगंटीवारांचा टोला

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर बोलावं अशी विरोधकांची मागणी आहे. मात्र, मोदींनी अजूनपर्यंत मणिपूरचा दौरा केलेला नाही, तसेच ते या विषयावर बोलले सुद्धा नव्हते.

विरोधकांचे आरोप काय..?

पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर(Manipur)मध्ये का गेले नाही? मणिपूर हिंसेवर बोलण्यासाठी मोदींना 80 दिवस का लागले? केवळ 30 सेकंदाचं भाष्य केलं. या 30 सेकंदात मोदी महिलांच्या नग्न धिंड निघाल्याच्या व्हिडीओवर बोलले, मणिपूरमधील हिंसेवर का बोलले नाही? मोदींनी मणिपूरमधील लोकांबाबत सहानुभूती का दाखवली नाही? त्यांनी मणिपूरमध्ये शांतता राखण्याचं आवाहन का केलं नाही ? असेही विरोधी पक्षांनी म्हटले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com