Satara Breaking News : दरे गावाकडे निघालेले मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर साताऱ्यात उतरले, प्रशासनाची तारांबळ

Mahabaleshwar Rain महाबळेश्वर परिसरात सातत्याने पाऊस पडत असून हवामान खराब झालेले आहे. त्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर सातारला आणण्यात आले.
Eknath shinde in Satara
Eknath shinde in Satarasarkarnama
Published on
Updated on

Satara CM News : मुंबईहून आपल्या दरे (महाबळेश्वर) गावाकडे दोन दिवस मुक्कामी निघालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर खराब झाल्यामुळे पुन्हा राजभवन हेलिपॅडवर तातडीने उतरविण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या हेलिकॉप्टरने ते दरे गावांकडे निघाले. मात्र, महाबळेश्वर परिसरात सातत्याने पाऊस पडत असून हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टर सातारकडे आणण्यात आले. सैनिक स्कुलच्या हेलिपॅडवर उतरुन मुख्यमंत्री शिंदे शासकिय विश्रामगृहात दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde दोन दिवस आपल्या दरे या मुळगावी मुक्कामी येणार होते. यासाठी सकाळी राजभवन Mumbai Rajbhavan येथून हेलिकॉप्टरने टेक ऑप केले. साधारण वीस मिनिटातच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये खराबी आल्याने पुन्हा तातडीने राजभवन हेलिपॅडवर उतरविण्यात आले.

त्यानंतर दुसऱ्या हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री शिंदे हे सातारकडे रवाना झाले. पण, महाबळेश्वर परिसरात सातत्याने पाऊस पडत असून हवामान खराब झालेले आहे. त्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर सातारला आणण्यात आले. येथील सैनिक स्कुलच्या हेलिपॅडवर उतरविण्यात आले.

मुख्यमंत्री साताऱ्यात येणार असल्याचे समजताच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व पोलिस सैनिक स्कुलच्या हेलिपॅडकडे रवाना झाले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या पुढील प्रवासासाठी ताफाही तैनात ठेवला.

Eknath shinde in Satara
Eknath Shinde Shivsena News : कोकणातला 'हा' बडा नेता शिंदेंची साथ सोडणार अन् भाजपात जाणार...! ; ठाकरे गटाच्या नेत्याने वात पेटवली

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी अधिकारी उपस्थित होते. हेलिपॅडवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडावेळ शासकिय विश्रामगृहात थांबले.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com