आमदारपुत्रासह सात जणांच्या मृत्यूचे पंतप्रधान मोदींना दु:ख; मदतीची घोषणा

वर्धा जिल्ह्यातील सेलुसराजवळ झालेल्या भीषण कार अपघातात भाजप आमदाराच्या मुलासह सात जणांचा मृत्यू झाला आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : वर्धा जिल्ह्यातील सेलुसराजवळ झालेल्या भीषण कार अपघातात (Car Accident) भाजप आमदाराच्या मुलासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले (Vijay Rahangadale) यांचा मुलाचा मृतांमध्ये समावेश आहे. सहाजण वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

नीरज चौहान, प्रथमवर्ष एमबीबीएस, नितेश सिंग, 2015, इंटर्न एमबीएएस, विवेक नंदन 2018, एमबीएबीएस फायनल पार्ट1, प्रत्युश सिंग, 2017, एमबीबीएस फायनल पार्ट 2, शुभम जयस्वाल, 2017, एमबीबीएस फायनल पार्ट 2, पवन शक्ती, 2020एमबीबीएस फायनल पार्ट 1 अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्य़ांची नावे आहेत. मृतांमध्ये भंडाऱ्यातील तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार याच्यासह त्याच्या मित्रांचाही मृत्यू झाला आहे.

Narendra Modi
भाजप आमदाराच्या मुलाचा कार अपघातात मृत्यू; इतर सहा विद्यार्थ्यांचाही दुर्दैवी अंत

या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे. 'महाराष्ट्रात सेलुसरा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दुःखी झालो आहे. ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावले आहे त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातातील जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो,' अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून सेलूसरा जवळ झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर या अपघातात जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

असा झाला अपघात...

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वजण देवळी येथून वर्धेला निघाले असताना सेलसुरा जवळ या विद्यार्थ्यांच्या कारचा अपघात झाला. वाहनावरून नियंत्रण सुटल्याने पुलावरून कार थेट 40 फूट खाली कोसळली. इतक्या उंचीवरुन विद्यार्थ्यांची कार खाली पडल्याने सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील सर्व मृत विद्यार्थ्यांची वये 25 ते 35 च्या दरम्यान आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं बचावकार्यास सुरुवात केली होती.

घटनेनंतर तब्बल चार तासाहून अधिक काळ मृतदेह कारमधून बाहेर काढण्याचं काम सुरु होतं. दरम्यान या ठिकाणी गेल्या 48 तासात झालेल्या तीन अपघातात 15 जणांनी आपला जीव गमावला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तर तब्बल चार तास मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com