Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदींची कर्तव्यनिष्ठा; आईच्या निधनानंतर दोन तासांत कामाला सुरुवात

Narendra Modi :...म्हणून पश्चिम बंगालच्या जनतेची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली
Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं आज पहाटे वयाच्या १०० व्या वर्षी निधन झालं. त्यानंतर त्यांच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये मोदींनी पश्चिम बंगालमधील वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनला ऑनलाईन हजेरी लावली. त्यामुळे दु:खाच्या प्रसंगात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्तव्यभावनेचा विसर पडू दिला नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या कर्तव्यनिष्ठेचे देशभरातून कौतुक होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पश्चिम बंगालमधील वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनाचा कार्यक्रम हा नियोजित होता. मात्र आज अचानक मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे या कार्यक्रमाला सहभागी होतील की नाही? याबाबत शाशंका होती.

मात्र, आई हिराबेन मोदी यांच्यावर सकाळी साडेनऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर अवघ्या दोन तासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नियोजित कामाला हजेरी लावली. दरम्यान, त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेचे देशभरातून कौतुक करण्यात येत आहे.

Narendra Modi
Narwekar No-Confidence Motion : पवारांची सही असती तर बरं झालं असतं; पण, एका वर्षात अविश्वास... : विधीमंडळ माजी सचिवांचे मोठे भाष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पश्चिम बंगालमधील वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती लावली. यावेळी ते म्हणाले, ''मला आज पश्चिम बंगालला यायचं होतं. पण माझ्या वैयक्तिक कारणामुळे पश्चिम बंगालला येऊ शकलो नाही. त्यामुळे मी पश्चिम बंगालच्या जनतेची माफी मागतो'', असं मोदी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com