PM Modi : ''त्यांना कसलीच लाज नाही...'' पंतप्रधान मोदींचे नितीश कुमारांसह 'I.N.D.I.A' आघाडीवर टीकास्त्र!

Controversial statement of Nitish Kumar : ''अजून किती खालच्या पातळीवर जाणार आहात?, जगभरात देशाला अपमानित करत आहात.'' असंही मोदी म्हणाले आहेत.
PM Modi
PM ModiSarkarnama
Published on
Updated on

Modi Vs Nitish Kumar : लोकसंख्या नियंत्रणाच्या मुद्द्य्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी विधानसभेत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून, त्यांच्यावर जबरदस्त टीका होत आहे. विशेषकरून भाजपा नेते त्यांना लक्ष्य करत आहेत. तर आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नितीश कुमारांसह विरोधकांच्या इंडिया आघाडीवर टीका केली आहे.

पंतप्रधान मोदींनी मध्यप्रदेशातील गुना येथे एका रॅलीला संबोधित करताना म्हटले की, '' इंडिया आघाडीच्या नेत्याने विधानसभेत माता-भगिणींच्या उपस्थितीत अशा प्रकारची विधानं केली, त्यांना काहीच लाज वाटत नाही.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

PM Modi
Nitish Kumar News : "मला माझीच लाज वाटतेय"; मुख्यमंत्री नितीशकुमारांनी हात जोडून मागितली माफी

मोदी म्हणाले, ''जे इंडी आघाडीचे नेते झेंडा घेऊन फिरत आहेत, जे देशातील सध्याचे सरकार पाडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळखेळत आहे. त्याच इंडी आघाडीच्या नेत्याने विधानसभेत जिथे माता-भगिनींची उपस्थिती होती, कोणी कल्पनाही करू शकत नाही की अशा भाषेत गलिच्छ वक्तव्यं केली.''

''जगभरात देशाला अपमानित करत आहेत'' -

पंतप्रधान मोदींनी म्हटले की, '' इंडी आघाडीचा एकही नेता माता-भगिनींबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात एक शब्दही बोलण्यास तयार नाही. ते तुमचं काय भलं करू शकता? किती दुर्दैव आहे, अजून किती खालच्या पातळीवर जाल. जगभरात देशाला अपमानित करत आहात. मात्र तुमच्या(जनतेच्या) सन्मानासाठी जे काही शक्य आहे ते मी करेन.'' याचबरोबर पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले की, ''ते लोक केवळ आपल्या मुला-मुलींची काळजी करतात. काँग्रेस भविष्याचा विचार नाही करत.''

PM Modi
Rajasthan Election : सचिन पायलटांचा कॉन्फिडन्स; म्हणाले, परंपरा मोडणार...राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेसचेच सरकार बनणार

का निर्माण झाला वाद? -

नितीशकुमार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली. विधानसभेत जातीनिहाय सर्वेक्षणावर निवेदन दिले. महिलांच्या शिक्षणामुळे राज्यात लोकसंख्या नियंत्रणात आणण्यास मदत झाल्याचे यावेळी मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले. लग्नानंतर पुरुष पत्नीशी लैंगिक संबंध प्रस्थापिक करतो (यावेळी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी हातांनी काही सूचक इशारे केले ). पण आम्ही महिलांना शिक्षित केल्यामुळे त्या योग्य वेळी पतीला लैंगिक संबंध करण्यास रोखत आहेत. यामुळे बिहारची लोकसंख्या नियंत्रणात आहे, असं नितीशकुमार यांनी पुढे म्हटलं. यानंतर नितीशकुमार यांनी अश्लील वक्तव्य केल्याची टीका विरोधकांनी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com