Arvind Kejriwal News : मोदींच्या 'डिग्री'चा मुद्दा पुन्हा तापणार; आर्थिक दंड ठोठावल्यानंतरही केजरीवाल कोर्टात...

AAP Vs BJP : केजरीवाल यांच्यानंतर काँग्रेससह ठाकरे गटानंही मोदींच्या पदवीवरुन भाजपला डिवचलं होतं.
Arvind Kejriwal News :  PM Modi Degree :
Arvind Kejriwal News : PM Modi Degree :Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शिक्षण किती झालं आहे, यासाठी त्यांची डिग्री दाखवण्याची मागणी केली होती. यावर गुजरात उच्च न्यायालयानं केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा आर्थिक दंड ठोठावतानाच मोदींची डिग्री सार्वजनिक करण्याची आवश्यकता नसल्याचं निर्णय दिला होता. मात्र, आता मोदींच्या डिग्रीचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी ( Narendra Modi) सार्वजनिक करावी या मागणीसाठी आप पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्यानंतर काँग्रेससह ठाकरे गटानंही मोदींच्या पदवीवरुन भाजपला डिवचलं होतं. आता न्यायालयानं दंड ठोठावून देखील केजरीवाल पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या डिग्रीवरुन आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत.

Arvind Kejriwal News :  PM Modi Degree :
Maharashtra politics : भाजपचे टार्गेट उद्धव ठाकरेच; अमित शाहांच्या भाषणात १० पेक्षा जास्त वेळा उल्लेख अन्...

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी पुन्हा एकदा मोदींच्या डिग्री प्रकरणात याचिका दाखल केली आहे. न्यायालयानं ती स्वीकारली असून या याचिकेवर येत्या 30 जून रोजी सुनावणी होणार आहे. केजरीवाल यांनी प्रथम एप्रिल 2016 मध्ये केंद्रीय माहिती आयोगाला अर्ज लिहीत त्यांच्या शैक्षणिक आणि पदवी संदर्भातील माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी केली होती.

'ही' माहिती देणे बंधनकारक नाही...

गुजरात हायकोर्टाचे न्यायमूर्ती बीरेन वैष्णव यांच्या खंडपीठानं मागील वेळी केजरीवाल यांच्या याचिकेवर अंतिम निकाल दिला होता. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शैक्षणिक माहिती सार्वजनिक असून कोणा त्रयस्थ व्यक्तीला त्यासंदर्भात जाहीर करण्यासाठी आरटीआयद्वारे ही माहिती देणे बंधनकारक नाही.

जेव्हा एखादी जनहिताशी संबंधित बाब नसेल तेव्हा युनिव्हर्सिटीला ही माहिती जाहीर करण्यासाठी जबरदस्ती करता येणार नाही असं नमुद केलं होतं. आताही नवीन याचिका ही न्यायमूर्ती बीरेन वैष्णव यांच्याकडेच सुनावणीसाठी दाखल करण्यात आली आहे.

Arvind Kejriwal News :  PM Modi Degree :
Bacchu Kadu: सरकारी रुग्णालयात अस्वच्छता, एका बेडवर दोन रुग्ण पाहून बच्चू कडू संतापले; अधिकाऱ्यांना खडसावत..

नेमकं प्रकरण काय आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची डिग्री( Modi Degree) सार्वजनिक करावा असा आदेश मुख्य निवडणूक आयोगाने दिला होता. याच आदेशाला गुजरात विद्यापीठाकडून गुजरात हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. यावर निर्णय देताना हायकोर्टाकडून आदेशाल स्थगिती देण्यात आली तर अरविंद केजरीवाल यांना २५ हजारांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com