Bacchu Kadu: सरकारी रुग्णालयात अस्वच्छता, एका बेडवर दोन रुग्ण पाहून बच्चू कडू संतापले; अधिकाऱ्यांना खडसावत..

Bacchu Kadu: बच्चू कडू यांनी अमरावती जिल्हा रुग्णालयाला भेट देत घेतली झाडाझडती
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Amravati : प्रहारचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी आज अमरावती जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी रुग्णालयातील अवस्था पाहून बच्चू कडू चांगलेच संतापले.

बच्चू कडू यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली त्यावेळी रुग्णालयात अस्वच्छता आणि एका बेडवर दोन-दोन रुग्ण होते. ही अवस्था पाहून बच्चू कडू यांना राग अनावर झाला आणि त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकाला चांगलच खडसावलं.

अमरावतीतील जिल्हा रुग्णालयातील या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आपण थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहणार असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. बच्चू कडू यांनी जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती घेतल्याने डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

Bacchu Kadu
Beed Collector News : कोयता सोडा, विकासाची कास धरा ; रोहयोतून हाताला काम देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा शब्द..

यावेळी माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, "या जिल्हा रुग्णालयाबाबत अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या. त्यामुळे येथील दुरावस्थेचा एकदा आढावा घेणं गरजेचं होतं. या रुग्णालयात डॉक्टरांची संख्या फारच कमी आहे. रुग्णालयात फार अस्वच्छता आहे. रुग्णालय स्वच्छ रहाण्यासाठी नियोजन करणं गरजेचं आहे. याच नाही तर अनेक रुग्णालयात अशीच अवस्था आहे", असं ते म्हणाले.

Bacchu Kadu
Raju Shetti News : राजू शेट्टींचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल ; म्हणाले,'' लबाड लांडगं ढोंग करतंय, गतिमान...''

दरम्यान, बच्चू कडू यांनी रुग्णालयाला भेट दिली त्यावेळी या रुग्णालयात अस्वच्छता होती. याबरोबरच तेथील कुलर बंद होतं. तसेच पिण्याच्या पाण्याचे मशीनही बंद होतं. एवढंच नाही तर रुग्णालयाच्या आपतकालीन कक्षाच्या बाहेरही अनेक खड्डे असल्याचे दिसून आले. यावरून त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावत नाराजी व्यक्त केली.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com