Prithviraj Chavan Politics : पक्षातील नेते भडकताच पृथ्वीराज चव्हाणांची सारवासारव; म्हणाले, काँग्रेसने आता..!

Delhi Assembly Election 2025 Sandeep Dixit Congress AAP : पृथ्वीराज चव्हाण यांनी मीडियाशी बोलताना दिल्लीत आपची सत्ता येऊ शकते, असे विधान केले होते.
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण हे आपल्याच विधानामध्ये कात्रीत अडकले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची सत्ता येऊ शकते, असे सूचक विधान त्यांनी केले होते. त्यानंतर दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर शरसंधान साधले. त्यांनी थेट आपमध्ये जावे, असा सल्लाच नेत्यांनी दिला होता. पक्षातूनच टीका सुरू झाल्यानंतर चव्हाणांनी खुलासा केला आहे.

दिल्लीत विधानसभा निवडणुकीत आप, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होणार आहे. इंडिया आघाडीतील सर्वच प्रमुख पक्षांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे काँगेस एकाकी पडली आहे. यापार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानामुळे काँग्रेसमधूनच विरोधी प्रतिक्रिया उमटत आहेत.

Prithviraj Chavan
Pune BJP News : 'खरी शिवसेना ठाकरेंचीच, शिंदेनी पक्ष चोरला?' - भाजपात आलेल्या माजी नगरसेवकांनी केली भूमिका स्पष्ट, म्हटले...

चव्हाण यांचा खुलासा

पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटरवरून खुलासा करताना आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, दिल्ली विधानसभा निवडणुकीवरील माझ्या विधानांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. जर इंडिया आघाडी एकत्रित लढली असती तर आघाडीचा विजय निश्चित झाला असता. आता सर्व प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असल्याने, ही एक खुली निवडणूक बनली आहे. काँग्रेसने आता मोठी आघाडी घेतली असून आपण विजयी होऊ, याची मला खात्री असल्याचे स्पष्टीकरण चव्हाणांनी दिले आहे.  

काय म्हणाले होते चव्हाण?

दिल्लीतील निवडणुकीवर बोलताना चव्हाण म्हणाले होते की, दिल्लीची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. मला वाटते कदाचित तिथे केजरीवाल जिंकतील. काँग्रेस आणि आपमध्ये युती झाली असती तर बरे झाले असते, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले होते. दिल्लीत काय चालले आहे. ते महाराष्ट्रात बसून सांगणे कठीण आहे, असेही चव्हाण म्हणाले होते.

Prithviraj Chavan
Bhaskar Bhagre Politics: राष्ट्रवादीच्या खासदार भगरे यांनी फटकारले, "मिटकरींना काहीच काम धंदे नाहीत"

संदीप दीक्षित यांचा संताप

काँग्रेसने संदीप दीक्षित यांना अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. चव्हाण यांच्या विधानावर ते चांगलेच संतापले. चव्हाण यांनी आपमध्ये प्रवेश करावा, असा सल्ला त्यांनी दिला. इतर पक्ष काय बोलतात, याच्याशी काहीही देणेघेणे नाही. चव्हाण हे काँग्रेसचे नेते आहेत. दिल्लीत राहिले आहेत. जर आमच्यापेक्षा चांगलं काम केजरीवालांनी केले असेल तर त्यांच्या पक्षात का जात नाही, असे दीक्षित म्हणाले आहेत. अशी वक्तव्य करून उघाच अज्ञान दाखवू नका. काँग्रेसचं समर्थन करावे, असे वाटत नसेल तर काँग्रेस सोडावी आणि आपमध्ये प्रवेश करावा, असा सल्ला दीक्षितांनी चव्हाणांना दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com