
उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेशातील (Uttarpradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Khiri) याठिकाणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्राने गाडीने चिरडले. या अपघातात आतापर्यंत नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना भेटायला जाणाऱ्या कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Congress leader priyanka gandhi) यांनाही उत्तप्रदेश पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांना सीतापूर गेस्ट हाऊसमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. कोणत्याही आदेशाशिवाय, एफआयआरशिवाय त्यांना कैद केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याशिवाय त्यांनी लखीमपूर खीरी हिंसाचाराप्रकरणी केंद्र आणि राज्यसरकारवर टिकाही केली आहे. प्रियंका गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मंत्र्याच्या मुलाने गाडीने शेतकऱ्यांना कसे चिरडले, ते त्यांनी दाखवलं आहे. या व्हिडीओनंतर त्यांनी उत्तरप्रदेश सरकार आणि केंद्रसरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हटले आहे प्रियंका गांधीनी
''मोदीजी नमस्ते, आज आपण स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी लखनऊला जाणार असल्याचे मला कळले. पण तुम्ही हा व्हिडीओ पाहिला का, यात मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्याना कसे चिरडले हे दाखवलं आहे. हा व्हिडीओ बघा आणि देशाच्या जनतेला सांगा, आतापर्यंत या मंत्र्याला निलंबित का नाही केलं, या मंत्र्याच्या मुलावर अद्याप कारवाई का नाही झाली, माझ्यासारख्या विरोधी पक्षातल्या नेत्याला तुम्ही कोणत्याही आदेशाशिवाय, एफआयआरशिवाय तुम्ही ताब्यात घेतले आहे. मग या मुलावर कधी कारवाई करणार, तो अजून बाहेर कसा आहे, त्याला अटक कधी होणार. असा सवाल प्रियंका गांधीनी विचारला आहे. तसेच, मंत्र्याच्या मुलाने जीपने शेतकऱ्यांना चिरडल्यानंतर युपी सरकारने सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे.असेही त्यांनी म्हटले आहे.
आज आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी लखनौला येत आहेत. पण देशाला स्वातंत्र्य कोणी मिळवून दिले, शेतकऱ्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आजही सीमेवर शेतकऱ्यांचीच मुले देशाचे संरक्षण करत आहेत. शेतकरी गेल्या कित्येक महिन्यांपासून त्रस्त आहेत, आपला आवाज उठवत आहेत, पण तुम्ही त्याला नाकारत आहेत. आज तुम्ही लखीमपूरला या ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, जे देशाचे अन्नदाता आहेत, जे देशाचा आत्मा आहेत, त्यांचा त्रास समजून घ्या, त्यांचा आवाज ऐका, त्यांची सुरक्षा कऱणे हा तुमचा धर्म आहे, ज्या संविधानावर हात ठेवून तुम्ही शपथ घेतली, त्याचा धर्म आहे तुमचे कर्तव्य आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.