Congress News : सलग दोन राज्यात विजय मिळवल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या, सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्या आता लोकसभा निवडणूक लढविणार की नाही अशी चर्चा सुरु होती. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
काँग्रेसच्या नेत्या, माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पदाधिकाऱ्याची बैठक झाली. या बैठकीत प्रियंका आता लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे सोनिया गांधी यांनी सांगितले. सोनिया गांधी यांच्या या निर्णयावर पक्षातील काही जण नाराज असल्याचे दिसते. प्रियंका गांधी या केवळ प्रचारावर भर देणार आहेत. स्टार प्रचारक म्हणून त्या देशभर सक्रीय राहणार आहेत.
हिमाचल प्रदेश निवडणुकीत सक्रिय झाल्यानंतर प्रियंका गांधी कर्नाटकात खूप सक्रिय होत्या. हिमाचल प्रदेशपाठोपाठ आता कर्नाटकातही प्रियंकाच्या निवडणुकीतील सहभागाचा परिणाम दिसून आला. प्रियंका या मोठ्या स्टार प्रचारक ठरू शकतात, त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवू नये, असे पक्षातील अनेक नेत्यांचे मत आहे. प्रियंका गांधींना राज्यसभेवर पाठवले तर ही त्यांच्यासाठी नवी राजकीय खेळी असेल.
प्रियंका यांना हिमाचल प्रदेशातून राज्यसभेवर पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रियांका गांधी यांची राजकीय इनिंग लवकरच राज्यसभेतून सुरू होऊ शकते. त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची निर्णयावर या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे. त्यासाठी काँग्रेसने तयारी पूर्ण केली आहे.
हिमाचल आणि कर्नाटक राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर प्रियंका गांधी यांनी चार राज्यात होणाऱ्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यासाठी त्यांनी निवडणूक अभियान सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशात येत्या १२ जून रोजी त्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर आता काँग्रेस पार्टी आगामी निवडणुकासाठी सज्ज झाली आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.
हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकातील विजयानंतर प्रियंका गांधी यांनी अन्य राज्यातील निवडणूका जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. मध्यप्रदेश आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीवर प्रामुख्याने प्रियंका गांधी यांचा फोकस राहणार आहेत. प्रियंका गांधी यांची यापूर्वी तेलंगणा येथे निवडणुकीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.