Death Threat To Sanjay Raut: पवारांपाठोपाठ राऊतांनाही जीवे मारण्याची धमकी, सकाळचा भोंगा बंद..

Maharashtra Politics : सुनील राऊत यांनाही फोनवरुन जीवे मारण्याची धमकी आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Sunil Raut, Sanjay Raut
Sunil Raut, Sanjay Rautsarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धमकी आल्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर येत आहे.

खासदार राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनाही फोनवरुन जीवे मारण्याची धमकी आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांना एकाच दिवसांत जीवे मारण्याच्या धमक्या आल्यामुळे खळबळ माजली आहे.

Sunil Raut, Sanjay Raut
Death Threat To Sharad Pawar: मोठी बातमी: शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, सुप्रिया सुळेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

काल (गुरुवारी) संजय राऊतांना सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही धमकी आली. सुनील राऊत यांच्या फोनवरुन ही धमकी देण्यात आली. फोन करणारा व्यक्ती हिंदीतून बोलत आहे.

संजय राऊत यांना सकाळी नऊचा भोंगा बंद करायला सांगा, त्यासाठी एका महिन्याची मुदत देतो, अन्यथा त्यांना गोळी मारु,अशी धमकी त्या व्यक्तीने दिली आहे.

महिन्याभरात दोन्ही भावांना गोळी मारुन स्मशानात पोहचवणार असल्याचे धमकी देणाऱ्याने म्हटले आहे. दोन महिन्यापूर्वी संजय राऊत यांना पुण्यातील एका तरुणाने धमकी दिली होती. या प्रकरणी राहुल तळेकर याला ताब्यात घेण्यात आले होते.

Sunil Raut, Sanjay Raut
Lok Sabha Elections 2024 : विधानसभेच्या मध्यावधीबरोबरच लोकसभेची निवडणूक ?; परिस्थिती पाहून पंतप्रधान मोदींकडून...

पवार यांना'राजकारण महाराष्ट्राचं' नावाच्या ट्विटर अकाऊंटवर ही धमकी दिली आहे. या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

"मला व्हा़ट्सअप वर हा मेसेज आालाय. ज्या पद्धतीने ही धमकी आली ती दुर्दैवी आहे. राज्यात दडपशाही आणि गुंडाराज सुरु आहे. धमकी देणारा भाजपचा (BJP) कार्यकर्ता आहे. जी धमकी आली आहे त्याच्या खाली त्याच पद्धतीने कमेंट्स करण्यात आल्या आहेत. या धमकीचा पाठपुरावा करुन आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. याची सर्व जबाबदारी राज्यसरकारआणि गृहमंत्रालयाची आहेत. मी राज्याच्या गृहमंत्रालयाकडे न्याय मागत आहे. जर काही बरंवाईट झालं तर त्याला जबाबदार राज्य सरकारची असेल, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com