प्रेषित पैगंबर अवमान प्रकरण; तेलंगणाचे आमदार टी. राजा भाजपमधून निलंबित

T. Raja| Telangana Politics| भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनाही पक्षाने याच कारणावरून ६ वर्षांसाठी निलंबित केले होते.
T. Raja| Telangana Politics|
T. Raja| Telangana Politics|
Published on
Updated on

नवी दिल्ली : प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबद्दल अनुद्गार काढणारे भाजपचे तेलंगमातील आमदार टी राजा सिंह यांना पक्षाने निलंबित केले असून, तुम्हाला पक्षातून बरखास्त का करू नये याचे १० दिवसांत उत्तर द्या, असे विचारणारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रषित पैगंबर यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याबद्दल भाजपला (BJP) पक्षातून हकालपट्टी करावे लागलेले राजा हे तिसरे नेते आहेत. या दरम्यान हैदराबाद पोलिसांनी राजा यांना आज अटक केली.

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनाही पक्षाने याच कारणावरून ६ वर्षांसाठी निलंबित केले होते. त्यांच्या वक्तव्याचा वाद अजूनही सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने शर्मा यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले होते. ते प्रकरण अजून शांत झालेले नाही तोवर तेलंगणातून दुसऱया भाजप नेत्यान प्रेषितांबद्दल गैरउद्गार काढले आहेत. तेलंगणाच्या रस्त्याने दक्षिण द्ग्विजयसाधू पाहणाऱया भाजप नेतृत्वाला त्याच तेलंगणातील मोहीमेला सुरवातीच्या काळात झालेला हा अपशकून सहन होणारा नाही. राजा यांना तत्काळ निलंबित करून पक्षनेतृत्वाने तेलंगणातही राजकीय ‘मेसेज' दिला आहे.

T. Raja| Telangana Politics|
सारे देव मागासवर्गीय किंवा आदिवासी, ब्राह्मण कोणीही नाही ! जेएनयूच्या कुलगुरूंचा ‘शोध'

तेलंगणातील २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत राजा सिंह भाजपच्या तिकीटावर विधानसभेवर निवडून आलेले आहेत. गोशामहल येथून निवडून आलेले हे टी राजा भाजपचे राज्यातील आमदार आहेत. यांच्याविरूध्द पोलिसांनी, धार्मिक श्रध्देला तडा दिल्याबद्दलचा गुन्हा दाखल केला आहे. राजा यांनी, आपण जिवाची पर्वा करत नाही.

जर कोणी राम व सीतामाता यांच्यासारख्या माझ्या देवदेवतांना अपमानित करत असेल, त्यांच्यावर ‘कॉमेडी‘ करत असेल तर आपल्यालाही कॉमेडीच्याच भाषेत सत्य सांगावे लागेल, असे म्हटले आहे. राजा यांच्याविरूध्द यापूर्वी अनेकदा भावना भडकावणारी चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल गुन्हे दाखल झाले आहेत. फेसबुक व इन्टाग्राम यांनीही २०२० मध्ये त्यांच्यावर बंदी घालून त्यांचे अकौंट ‘बंद' करण्याची कारवाई केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com