भाजपने उमेदवारांची नावं जाहीर करताच इच्छुकांचे राजीनामे अन् जाळपोळ

भाजपच्या मुख्यालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Manipur
ManipurSarkarnama

गुवाहाटी : मणिपूरमध्ये (Manipur) सत्ताधारी भाजपला (BJP) रविवारी मोठा झटका बसला. विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) सर्व 60 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करताच अनेक इच्छुकांनी तडकाफडकी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच काही विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या पुतळ्यासह कार्यालयांची जाळपोळ करत इशारा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या मुख्यालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मणिपूरमध्ये भाजपने यावेळी कोणतीही आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रविवारी एकाचवेळी सर्व 60 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. ही यादी बाहेर येताच मणिपूरमध्ये अनेक मतदारसंघात रणकंदन सुरू झाले. यादीमध्ये काँग्रेसमधून (Congress) आलेल्या अनेक नेत्यांची नावे आहेत. तसेच काही विद्यमान आमदारांनाही पक्षाने तिकीट नाकारले आहे. (Manipur Election 2022)

Manipur
निवडणुका तर होतच राहतील पण...! पंतप्रधान मोदींनी केली खासदारांना विनंती

या कारणांमुळे भाजपमधील इच्छूक तसेच अनेक वर्षांपासून पक्षात काम करणारे नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. काही इच्छूकांनी राजीनामे दिले असून विद्यमान आमदारही पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलामध्ये काही जणांनी प्रवेश केला आहे. भाजपचे नेते अरूणकुमार, एन रॉबर्ट, के. एच सुरेश, टी. एच. ब्रिंदा यांना तिकीट नाकारल्याने नितीश कुमार यांच्या पक्षात दाखल झाल्याचे सुत्रांनी सांगितले. (Manipur Election Update)

भाजपचा पूर्वीचा मित्रपक्ष असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) नेही भाजपमधील अनेक पदाधिकारी तसेच काँग्रेसमधील काही जणांसोबत बोलणे सुरू असून ते लवकरच पक्षात येतील, असा दावा केला आहे. नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचे पुतळे जाळले. तसेच पक्षाच्या मुख्यालयातही तोडफोड केली. त्यामुळे मुख्यालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Manipur
धक्कादायक : पोलीस उपनिरीक्षकावर बलात्कार; भाजप नेत्यासह बारा जणांवर आरोप

दरम्यान, मणिपूरमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात 27 फेब्रुवारी तर दुसऱ्या टप्प्यात तीन मार्च रोजी मतदान होणार आहे. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसचे 28 आमदार निवडून आले होते. पण त्यानंतरही 21 आमदार असलेल्या भाजपने दोन प्रादेशिक पक्षांना सोबत घेत सरकार बनवले होते. पण या निवडणुकीत भाजपने दोन्ही पक्षांना दूर ठेवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com