धक्कादायक : पोलीस उपनिरीक्षकावर बलात्कार; भाजप नेत्यासह बारा जणांवर आरोप

नेत्याचे पीए, सुरक्षारक्षकांसह अतिरिक्त पोलीस अधिक्षकांवरही पीडितेने आरोप केले आहेत.
Banwar Singh Palada
Banwar Singh PaladaSarkarnama

जयपूर : राजस्थानमधील (Rajasthan) भिलवाडा येथील एका महिला पोलिस उपनिरीक्षकावर भाजप नेत्याने लग्नाचे अमिष दाखवत बलात्कार (Rape) केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये भाजप (BJP) नेत्यासह अतिरिक्त पोलीस अधिक्षक, भाजप नेत्याचा पीए, सुरक्षारक्षक अशा बारा जणांना आरोपी करण्यात आलं आहे. या घटनेने राजस्थानमध्ये खळबळ उडाली आहे.

अजमेर (Ajmer) जिल्हा परिषदेच्या प्रमुख आणि माजी आमदार सुशील कंवर यांचे पति माजी भाजप नेते भंवरसिंह पलाडा (Bhanwar Singh Palada) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिलवाडा (Bhilwada) येथील प्रताप नगर पोलीस ठाण्यात महिला पोलीस उपनिरीक्षकाने ही तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे या तक्रारीत अतिरिक्त पोलीस अधिक्षक संजय गुप्ता यांचेही नाव असल्याने पोलीस दल हादरले आहे.

Banwar Singh Palada
राऊत शब्दाचे पक्के; उत्पल पर्रीकरांचा अर्ज वैध ठरताच घेतला मोठा निर्णय

पीडित महिलेने केलेल्या आरोपांनुसार, भिलवाडा पोलीस लाईनमध्ये घरात भंवर सिंह पाडा यांनी 2018 ते 2021 या कालावधीत लग्नाचे अमिष दाखवून अनेकदा बलात्कार केला. यामध्ये संजय गुप्ता यांच्यासह पलाडा यांचे चालक रविंद्र, पीए किशनपुरी, सुरक्षारक्षक करण, बजरंग, विजय, मनिषा, धीरज यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये महिला कॉन्स्टेबल रश्मी आणि शिव बन्ना यांचीही नावे आहेत.

2018 मध्ये बदलीसाठी नागौर येथील तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधिक्षक संजय गुप्ता यांच्या सांगण्यावरून पीडित महिलेने पलाडा यांच्याशी संपर्क साधला होता. विधानसभा निवडणुकीदरम्यान पलाडा यांनी घरी येऊन बलात्कार केला. विरोध केल्यानंतर पिस्तुलाचा धाक दाखवण्यात आला. त्यानंतर लग्न करण्याचे अमिषही दाखवले. एप्रिल 2021 मध्ये जोधपुर येथे पलाडा व इतर काही जणांनी मारहाण केली. त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे आपली हत्याही होऊ शकते, असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

Banwar Singh Palada
सोमय्यांच्या पत्रकार परिषदेनंतर शरद पवारांचा थेट राऊतांना फोन!

दरम्यान, भिलवाडाचे पोलीस अधिक्षक आदर्श सिध्दू यांनी या प्रकरणाचा तपास शाहपुराचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक चंचल मिश्रा यांच्याकडे सोपवली आहे. पलाडा यांनी अजमेर जिल्हा प्रमुखाची निवडणूक लढवण्यासाठी भाजपशी बंडखोरी करत काँग्रेसचे (Congress) समर्थन केले होते. तेव्हापासून पलाडा पती-पत्नीला भाजपने सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. मागील काही दिवसांमध्ये राजस्थानमध्ये सतत बलात्काराच्या घटना समोर येत असल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com