Public Examinations Bill 2024 : 'पेपर लिक' प्रकरणी मोदी सरकार अलर्ट, उचललं मोठं पाऊल; 1 कोटींचा दंड अन्..!

Parliament Update : कार्मिक मंत्री जितेंद्रसिंह यांनी लोकसभेत विधेयक मांडले.
Public Examinations Bill 2024
Public Examinations Bill 2024Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News :

देशातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या, परीक्षा देणाऱ्या उमेदवार आणि विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी. अनेकदा स्पर्धा परीक्षांचे परीक्षा फोडले जातात. त्यामुळे ज्यांनी दिवसरात्र अभ्यास केला अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होते. अशी अनेक प्रकरणे झाली आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. पेपर फोडणाऱ्यांना म्हणजेच पेपर लीक करणाऱ्यांना कायमचा धडा शिकवण्याचा निर्धार सरकारने केला आहे. त्यासाठी पब्लिक एक्झामिनिशन बिल 2024 आज लोकसभेत (Loksabha) सादर करण्यात आले.

कार्मिक, सार्वजनिक तक्रार व निवृत्तीवेतन मंत्री जितेंद्रसिंह यांनी आज हे विधेयक लोकसभेत मांडले. लोकसभेतील मंजुरीनंतर हे विधेयक राज्यसभेत (Rajyasabha) मंजुरीसाठी जाईल. दोन्ही सभागृहांमध्ये विधेयक मंजूर झाल्यानंतर यावर राष्ट्रपती मंजुरीची मोहोर उमटवतील.

Public Examinations Bill 2024
Chandigarh Mayoral Polls : चंद्रचूड यांचा भाजपला झटका; निवडणूक अधिकाऱ्याला झाप झाप झापलं अन् घाम फोडला

यूपीएससीच्या परीक्षा तसेच स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षाचे पेपर फुटण्याचे प्रकार वाढल्याने होतकरू उमेदवारांचे नुकसान होते. या प्रकारामुळे पुन्हा परीक्षा घ्याव्या लागतात. हा सर्व वाढीव ताण असतो. याबाबत ठोस कायदा नसल्याने आरोप नंतर मोकळे सुटतात. म्हणूनच त्यावर पब्लिक एक्झामिनेशन बिल 2024 (( Public Examinations (Prevention of Unfair Means) Bill, 2024 )) हा उपाय काढण्यात आला आहे. हे विधेयक आज लोकसभेत मांडले. याचा कायदा झाल्यानंतर आरोपीला किमान 3 वर्षे आणि कमाल 10 वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. शिवाय तब्बल एक कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

या कायद्यातील या तरतुदींमुळे पेपरफुटीच्या प्रकारांना आळा बसेल, असा केंद्र सरकारला विश्वास आहे. संसदेच्या बजेट अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणात या विधेयकाचा उल्लेख केला होता. तसेच अलीकडेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाला मंजुरी देण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इंजिनीअरिंगसाठी जेईई (JEE), मेडिकल परीक्षेसाठी (NEET) तसेच CUET परीक्षा या शिवाय रेल्वे भरती, बँकिंग क्षेत्रातील भरतीसाठी विविध परीक्षा घेतल्या जातात. शिवाय सनदी नोकऱ्यांसाठी यूपीएससी आणि स्टाफ सिलेक्शन बोर्डाकडून परीक्षा घेतल्या जातात. त्यासाठी खूप तयारी केली जाते. तरीही पेपरफुटीचे प्रकार घडतात. विद्यार्थीदेखील या परीक्षांसाठी वर्ष-दोन वर्ष अभ्यास करत असतात. अशावेळी पेपरफुटी झाली तर परीक्षार्थींचा आत्मविश्वास ढासळतो. म्हणूनच केंद्र सरकारने नवीन कायदा करण्याचा निर्धार केला.

(Edited by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com