Pulkit Mani : मोदींची मिमिक्री भोवली? पुलकित मनीचे 3 शो रद्द; धमक्यांचा दावा

Pulkit Mani three UP shows cancelled after Modi mimicry at Rahul Gandhi Indore event : राहुल गांधींच्या इंदूरमधील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमातील सादरीकरणानंतर वाद; नोएडा, लखनऊ आणि कानपूरमधील शो रद्द झाल्याची पुलकित मनीची माहिती
Pulkit Mani
Pulkit ManiSarkarnama
Published on
Updated on

Pulkit Mani Modi Mimicry : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिमिक्रीमुळे चर्चेत आलेला स्टँडअप कॉमेडियन पुलकित मनी अडचणीत सापडला आहे.

इंदूर येथे आयोजित काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केल्यानंतर पुलकित मनीचे उत्तर प्रदेशातील नोएडा, लखनऊ आणि कानपूर येथील नियोजित शो रद्द झाले आहेत.

पुलकित मनीने सोशल मीडिया (Social Media) पोस्टद्वारे या शोच्या रद्द होण्याची माहिती दिली. सुरुवातीला नोएडा येथील शो ‘अनपेक्षित परिस्थितीमुळे’ रद्द झाल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर लखनऊ आणि कानपूर येथील कार्यक्रमही रद्द झाल्याचे त्याने जाहीर केले. या दोन्ही शोच्या पार्श्वभूमीवर त्याने सतत धमक्या मिळत असल्याचा दावा केला आहे.

19 सप्टेंबर रोजी इंदूर येथे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात पुलकित मनी सहभागी झाला होता. यावेळी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्याची आणि काही हावभावांची नक्कल केली. यामध्ये तो राहुल गांधी यांना मिठी मारतो, जोरजोरात हसून ‘माय फ्रेंड’ म्हणताना दिसतो. याशिवाय ‘गलगोटिया’, ‘लवणेन भोज्यम’ असे प्रचलित शब्द देखील त्याने वापरले. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

Pulkit Mani
Priyank Kharge BJP Challenge : वंदे मातरम् वाद चिघळला; प्रियांक खर्गेंचं भाजपला थेट आव्हान, म्हणाले...

त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली. विशेषतः मिमिक्रीदरम्यान पंतप्रधानांच्या दिवंगत आईसंदर्भात करण्यात आलेल्या उल्लेखावरून राजकीय वाद निर्माण झाला. दुसरीकडे, काँग्रेसकडून या सादरीकरणाचा बचाव करण्यात आला आणि तो विनोद आणि मिमिक्रीचा भाग असल्याचे सांगण्यात आले.

Pulkit Mani
Anil Bonde Dance Video : दुष्काळाच्या चर्चा, काजू-बदाम वादानंतर अनिल बोंडेंचा DJवर ठेका; VIDEO व्हायरल

‘आता अंडरग्राऊंड होण्याची वेळ…’

शो रद्द झाल्यानंतर पुलकित मनीच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चा रंगली आहे. त्याने नोएडा शो रद्द झाल्याचे सांगताना चाहत्यांची माफी मागितली. त्यानंतर लखनऊ आणि कानपूरमधील शो रद्द करण्यामागे वारंवार धमक्या मिळत असल्याचा दावा त्याने केला. दरम्यान, शो नेमके आयोजकांनी रद्द केले की पुलकित मनीने स्वतः रद्द केले, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

मिमिक्रीनंतर वाढला वाद

पुलकित मनी हा सार्वजनिक व्यक्तींच्या मिमिक्रीसाठी ओळखला जाणारा स्टँडअप कॉमेडियन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैलीची मिमिक्री करणाऱ्या त्याच्या सोशल मीडिया कंटेंटला यापूर्वीही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमातील सादरीकरणानंतर मात्र त्याच्या शो रद्द होण्याच्या मुद्द्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

कामरानंतर मनी अडचणीत?

गेल्या वर्षी कमेडियन कुणाल कामरा अशाच एका विडंबन गीतामुळे अडचणीत आला. मार्च 2025 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कामरा विरोधात गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून त्याला देखील शो करणे कठीण होऊन बसले. या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय व्यंग, मिमिक्री आणि सार्वजनिक कार्यक्रमांमधील विनोद यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com