Pulwama : लवकरच पुलवामासारखा हल्ला! सोशल मीडियात पोस्ट करणाऱ्यास अटक, राजनाथ सिंह काश्मीरमध्ये

Rajnath Singh : राजनाथ सिंह काश्मीरमध्ये आढावा घेत आहेत...
Rajnath Singh
Rajnath SinghSarkarnama
Published on
Updated on

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये मागील आठवड्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराचे चार जवान शहीद झाले.. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज काश्मीरच्या दौरावर आहेत. त्यातच सोशल मीडियात एका विद्यार्थ्याने केलेल्या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. लवकरच पुलवामासारखा हल्ला होईल, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यानंतर झारखंडमधील या विद्यार्थ्याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले आहे.

या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्याची चौकशी केली जात आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) काही दिवस आधीच पुलवामामध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (CRPF) 40 जवान शहीद झाले होते. असाच हल्ला लवकरच होईल, अशी पोस्ट विद्यार्थ्याने केली होती.

Rajnath Singh
Ram Mandir News : राम मंदिराबाबत ममतादीदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

दरम्यान, मंगळवारी सुरक्षा यंत्रणांकडून पुलवामामधून (Pulwama) तीन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. तसेच मागील आठवड्यात दहशतवादी हल्ल्यात चार जवान शहीद झाले असून त्यामध्ये दोन कॅप्टनचा समावेश आहे. तीन जवान जखमीही झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या हल्ल्यानंतर राजनाथ सिंह (Rajnath Singh) हे सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. राजभवनमध्ये उच्चस्तरीय बैठकीचे नियोजन असल्याचेही समजते. सध्या लष्कराचे दहशतवादविरोधी ऑपरेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

सुरक्षा दलांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे काही नागरिकांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेमुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. याचा आढावाही राजनाथ सिंह यांच्याकडून घेतला जाणार आहे.

Edited by Rajanand More

Rajnath Singh
Amit Shah News : शाहांच्या बैठकीनंतर काही तासांतच थेट राष्ट्रीय सचिवांना डच्चू

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com