सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर आप सरकार बॅकफूटवर; गाजावाजा करीत घेतलेला मोठा निर्णय अखेर मागे

सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर 'आप'च्या सरकारवर होतेय टीका
Sidhu Moose Wala Case News Updates, AAP News Updates, Punjab News, Bhagwant Mann News
Sidhu Moose Wala Case News Updates, AAP News Updates, Punjab News, Bhagwant Mann NewsSarkarnama

नवी दिल्ली : पंजाबमधील (Punjab) काँग्रेसचा (Congress) नेता व प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) याची हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणामुळं राज्यभरात खळबळ उडाली आहे. हत्येच्या 24 तास आधी सिद्धूसह 424 व्हीआयपींची सुरक्षा आम आदमी पक्षाच्या (AAP) सरकारनं कमी केली होती. या प्रकरणी आप सरकार टीकेचे धनी बनले असून, उच्च न्यायालयानेही नोटीस बजावली आहे. यानंतर आता बॅकफूटवर येत सुरक्षा कमी केलेल्या 420 जणांची सुरक्षा पूर्ववत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. (Sidhu Moose Wala Case News Updates)

सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर आप सरकार तोंडघशी पडले आहे. राज्यातील 420 व्हीआयपींची सुरक्षा 7 जूनपासून पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती आप सरकारने आज पंजाब व हरियाना उच्च न्यायालयात दिली. सिद्धू मूसेवालासह 424 जणांची सुरक्षा सरकारनं कमी केली होती. सुरक्षा कमी करण्यात आलेल्या व्यक्तींची यादीही उघड झाली होती. यावरून आज पंजाब हरियाना उच्च न्यायालयानं आप सरकारला झापलं होतं. सुरक्षा कमी काढण्यात आलेल्या व्यक्तींची यादी उघड झालीच कशी? असा प्रश्न न्यायालयानं उपस्थित केला होता. याप्रकरणी न्यायालयानं सरकारला नोटीस बजावली होती. सिद्धू मूसेवालासह इतर 424 जणांची सुरक्षा कोणत्याही निकषांच्या आधारे कमी केली, याबाबत मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सरकारने लिफाफाबंद अहवाल 2 जूनला सादर करावा, असे निर्देश उच्च न्यायालयानं दिले होती.

Sidhu Moose Wala Case News Updates, AAP News Updates, Punjab News, Bhagwant Mann News
जातीनिहाय जनगणनेला भाजपचा विरोध नाही पण...

विशेष म्हणजे, पंजाबमधील आप सरकारनं व्हीआयपींची सुरक्षा कमी केल्याचं ट्विटही केलं होतं. सरकारनं पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये 424 जणांची सुरक्षा कमी केल्याचा उल्लेख होता. पंजाबमध्ये व्हीआयपी संस्कृतीवर वार, असे त्यात म्हटले होते. सर्वांत महत्वाची बाब म्हणजे सुरक्षा कमी करण्यात आलेल्या काही निवडक व्यक्तींची नावे त्यात देण्यात आली होती. यात गायक सिद्धू मूसेवालाचेही नाव होते. पंजाबमध्ये व्हीआयपी सुरक्षेवर मोठी कारवाई, असं म्हणत या ट्विटमध्ये मुख्यमंत्री मान यांचा फोटोही होता.

Sidhu Moose Wala Case News Updates, AAP News Updates, Punjab News, Bhagwant Mann News
राजकारण तापलं! घोडेबाजार रोखण्यासाठी काँग्रेसनं लढवली शक्कल

सिद्धू मूसेवालाची हत्या कशी झाली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मूसेवाला हा त्याच्या गाडीतून जात असताना दोन गाड्यातून हल्लेखोर त्याचा पाठलाग करीत होते. जवाहरके गावात त्यांनी सिद्धूच्या गाडीवर गोळीबर केला. यात तो जागीच ठार झाला. दोन गुन्हेगारी टोळ्यांतील अंतर्गत संघर्षातून हा प्रकार झाल्याचा संशय आहे. हल्लेखोरांनी रशियन बनावटीच्या एएन-94 रायफलींचा वापर केला. सिद्धू याच्यावर 30 गोळ्या झाडण्यात आल्या. त्या किमान तीन रायफलींमधून झाडण्यात आल्या. हल्लेखोरांनी नंतर त्याचा मृत्यू झाल्याची खातरजमा करूनच तेथून पलायन केलं. सिद्धूबरोबर असलेले दोन जण जखमी असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com