ISI Spies in Panjab : धक्कादायक! पहलगाम हल्ल्यानंतर अमृतसरमध्ये ISI चे गुप्तहेर? दोघांच्या अटकेमुळे खळबळ

Pahalgam Terror Attack : काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार आणि भारतीय लष्कर अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी सुरू असून NIA कडूनही चौकशी केली जातेय.
Pakistani Spies in Amritsar
Pakistani Spies in Amritsarsarkarnama
Published on
Updated on

Amritsar News : काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार आणि भारतीय लष्कर अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी सुरू असून NIA कडूनही चौकशी केली जातेय. याचदरम्यान आता अमृतसरमध्ये पंजाब पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. अमृतसर पोलिसांनी येथून दोघांना अटक केली असून चौकशीत ते दोघे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे गुप्तहेर असल्याचं आता समोर आले आहे. पलक शेर मसीह आणि सूरज मसीह अशी या दोघांची नावे आहेत.

पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटकांचे प्राण गेले आहेत. यामुळे भारत सरकारने पाकिस्तानशी असणारे सर्व राजनैतिक संबंध कमी करत मोठे निर्णय घेतले. यामध्ये सर्व पाकिस्तानी लोकांना परत पाठवणे. आयात-निर्यातीवर बंदी घालण्यासह सिंधू करारही रद्द करण्यात आला आहे. यानंतर आता नियंत्रण सीमेसह देशांतर्गत देखील तपास यंत्रणांकडून तपास केला जात आहे.

यादरम्यान अमृतसरमध्ये पंजाब पोलिसांनी पाकिस्तानी हेरांविरोधात मोहिम हाती घेत मोठी कारवाई केली आहे. पलक शेर मसीह आणि सूरज मसीह अशा दोन आयएसआयच्या एजेंटांना पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत. हे दोघे येथून भारतीय लष्कर आणि अमृतसर एअरबेसशी संबंधित माहिती पाकिस्तानला देत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. तर हे दोघे अमृतसर तुरुंगात बंद असलेल्या हरप्रीत सिंग उर्फ ​​हॅप्पीच्या संपर्कात असल्याचीही माहितीही आता समोर येत आहे.

Pakistani Spies in Amritsar
Pahalgam Terror Attack : 'त्या' सहा पाकिस्तानी महिला अजूनही नाशिकमध्येच, काय कारण?

पंजाब पोलिसांनी पलक शेर मसीह आणि सूरज मसीह या दोन संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून भारतीय लष्करी छावण्या, हवाई तळ आणि इतर मोक्याच्या ठिकाणांचे फोटो आणि माहिती सापडली आहे. आता या दोघांची चौकशी सुरू असून तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. या दोघांनी पाकिस्तानला आणखी कोणती माहिती पाठवली आहे? त्या नेमका यामागचा हेतू काय? याचाही तपास आता पंजाब पोलिस करत आहेत.

Pakistani Spies in Amritsar
Pahalgam Terror Attack: 'NIA' च्या टीमनं दहशतवाद्यांची कुंडली काढली? तब्बल 3 हजार संशयितांची चौकशी,100 ठिकाणी छापेमारी अन्...

राजस्थानमधून एकास अटक

दरम्यान, एक दिवस आधीच राजस्थानमधून एका गुप्तहेराला अटक करण्यात आली होती. जैसलमेरमधील झिरो आरडी मोहनगडचा रहिवासी असून, पाकिस्तानी गुप्तहेरांना लष्करी क्षेत्राचे व्हिडिओ आणि फोटो पाठवत असल्याचा संशय पोलिसांना होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com