Raebareli Loksabha News: 'रायबरेली' गांधी घराण्याचा बालेकिल्ला, आई-आजी निवडून आल्या; पण राहुल गांधींचं काय होणार?

Loksabha Election 2024 : 1971 ते 2019 या कालावधीत झालेल्या 13 लोकसभा निवडणुकांपैकी काँग्रेसनं रायबरेलीतही तब्बल 10 वेळा विजय मिळवला आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama

संदीप चव्हाण-

Loksabha Election 2024 News : उत्तरप्रदेशातील अमेठी आणि रायबरेली म्हणजे गांधी घराण्याचे पारंपरिक लोकसभा मतदारसंघ. 1971 पासूनच्या लोकसभा निवडणुका पाहाता गांधी परिवारातील सदस्य अमेठीतून आठ तर रायबरेलीतून सहावेळा खासदार म्हणून निवडून गेले आहेत. राजीव गांधी आणि राहुल गांधी या पिता-पुत्रांनी तर अमेठीतून विजयाची हॅटट्रिक साधली आहे तर सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून विजयाचा चौकार मारला आहे.

प्रियंका गांधी यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक न लढण्याचा तर राहुल गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झालेले राहुल गांधी यंदा अमेठीऐवजी पहिल्यांदाच रायबरेलीतून निवडणूक लढवत आहेत. अमेठीमध्ये काँग्रेसनं किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.

तिकडं भाजपनं रायबरेलीतून दिनेश प्रताप सिंह यांना राहुल गांधी यांच्याविरुद्ध निवडणूक रिंगणात उतरवलं आहे तर अमेठीतून स्मृती इराणी निवडणूक लढवत आहेत. रायबरेली आणि अमेठी येथील निवडणुकांचा आजवरचा इतिहास पाहाता काँग्रेससाठी हे दोन्ही मतदारसंघ फायद्याचे ठरत आले आहेत.

Rahul Gandhi
Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना स्वत:च्या विजयाची खात्री नाही ते देशाची गॅरंटी काय देणार ?

अमेठीत राजीव गांधी-राहुल गांधींकडून विजयाची हॅटट्रिक!

13 लोकसभा निवडणुकांपैकी कॉंग्रेसनं अमेठीत 1971 ते 2019 या कालावधीत झालेल्या तब्बल 10 वेळा विजय मिळवला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी अमेठीतून 1984, 1989 आणि 1991 तर राहुल गांधी यांनी 2004, 2009 आणि 2014 असा सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅटट्रिक साधली होती.

मात्र, 2019 मध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. याच मतदारसंघातून 1980 मध्ये संजय गांधी यांनी विजय मिळवला होता मात्र 1977 च्या निवडणुकीत भारतीय लोक दलाच्या रवींद्र प्रताप सिंह यांनी संजय गांधी यांना पराभूत केलं होतं. अमेठीतून 1999 मध्ये सोनिया गांधी विजयी झाल्या होत्या. अमेठीतून 1996 मध्ये काँग्रेसचे कॅ. सतीश शर्मा तर 1971 मध्ये काँग्रेसचे विद्याधर वाजपेयी यांनी विजय मिळवला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

रायबरेलीत सोनिया गांधींकडून विजयी चौकार!

1971 ते 2019 या कालावधीत झालेल्या 13 लोकसभा निवडणुकांपैकी काँग्रेसनं रायबरेलीतही तब्बल 10 वेळा विजय मिळवला आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी तर रायबरेलीतून विजयाचा चौकार मारलाय. रायबरेलीतून सोनिया गांधी 2004, 2009, 2014 आणि 2019 अशा सलग चार वेळा निवडून आल्या आहेत.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी 1971 आणि 1980 अशा दोन वेळा रायबरेलीतून खासदार बनल्या मात्र 1977 मध्ये त्यांना भारतीय लोक दलाच्या राजा नरेन यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. रायबरेलीतून 1999 मध्ये कॉंग्रेसचे कॅ. सतीश शर्मा, 1991 आणि 1989 मध्ये कॉंग्रेसच्या शीला कौल तर 1984 मध्ये अरुण नेहरू यांनी विजय मिळवला होता.

एकूणच काय तर काँग्रेससाठी धार्जिण असलेल्या अमेठी आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघांत यावेळी देखील काँग्रेसचे उमेदवार जिंकून येणार का? आणि रायबरेलीकर आई व आजी यांच्याप्रमाणं राहुल गांधी यांनाही विजयी करणार का? याचा निकाल आजपासून बरोबर एक महिन्यानंतर लागणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Rahul Gandhi
Nashik Lok Sabha Election 2024 : वाजेंच्या बालेकिल्ल्यात हेमंत गोडसेंचा एकाकी प्रचार, कोकाटे फिरकलेच नाही; कारण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com